रशियासाठी धक्कादायक बातमी ; अमेरिका आणि युक्रेनमध्ये खनिज करारावर स्वाक्षरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन/कीव: अखेर अमेरिका आणि युक्रेनमध्ये खनिज करार स्वाक्षरी करण्यात आली. (30 एप्रिल) हा करार दोन्ही देशांनी मंजूर केला. या करारांतर्गत अमेरिका युक्रेनच्या खनिज संसाधनांमध्ये गुंतवणून करेल आणि या बदल्यात युक्रेलनला देशाच्या पुनर्बांधणीसाठी मदत करेल. या करारानुसार, अमेरिका युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी एक संयुक्त गुंणवतूणूक निधीची मदत करणार आले. हा करारा युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर करण्यात आला आहे. अद्याप कराराचे इतर तपशील जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु या करारामुळे हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिका रशियासोबतच्या युद्धात युक्रेनच्या बाजूने असेल. या करारामुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यात युक्रेनच्या खनिज संपत्तीची मागणी केली होती. ही मागणी युक्रेनने मान्य केली यावेळी हा करार करण्यात आला. याच वेळी अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने हा करारा ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडला असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, हा निधी युएस ट्रेझरी डिपार्टमेंट आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अंतर्गत करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलच्या जंगलामध्ये भीषण आग ; देशात आणीबाणीची परिस्थिती, VIDEO
On April 30, the United States and Ukraine signed an agreement to establish the United States-Ukraine Reconstruction Investment Fund.
This historic economic partnership clearly signals the Trump Administration’s commitment to a free, sovereign, and prosperous Ukraine. pic.twitter.com/cKUACUhet9
— Treasury Department (@USTreasury) April 30, 2025
अर्थमंत्री बेसंट यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे हा करार शक्य झाला आहे. तसेच आता यामुळे अमेरिका रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनच्या पाठिशी उभा आहे. तसेच बेसेंट यांनी हेही स्पष्ट केले आहे की, कोणताही देश रशियाच्या बाजूने उभा राहिला तर याचा रशियाला फायदा होणार नाही.
या करारांतर्गत अमेरिकेला युक्रेच्या नैसर्गिक संसाधनांवर म्हणजे, ॲल्युमिनियम, ग्रेफाइट, तेल आणि इतर नैसर्गिक वायू सारख्या खनिजांमध्ये गुंतवणूक करण्याचा अधिकार मिळाला आहे. युक्रेनच्या उपप्रधानमंत्री युलिया स्विरिडेंको यांनी या करारावर 30 एप्रिल रोजी वॉशिंग्टन येथे स्वाक्षरी केली. यापूर्वी फ्रेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान हा करारा होणार होता. परंतु ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या वादविवादामुळे हा करार लांबवणीवर पडला.
वादविवादानंतर ट्रम्प-झेलेन्स्की भेट
दरम्यान फेब्रुवारील झालेल्या वादानंतर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात 26 एप्रिल रोजी दोन महिन्यानंतर भेट झाली. पोप यांच्या अत्यंसंस्काराला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ट्रम्प आणि झेलेन्स्की देखील पोप यांना अंतिम निरोप देण्यासाठी आले होते. याच दरम्यान व्हॅटिकन सिटीमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान केवळ ट्रम्प आणि झेलेन्स्की उपस्थित होते. दोघांनी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. या भेटीवर झेलेन्स्की यांनी म्हटले होते की, बैठकीमुळे त्यांना अपेक्षित असलेली शांतता निर्माण झाली आहे.
दोन्ही देशांमधील हा करार अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. रशियाविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेच्या मदतीची युक्रेनला अत्यंत आवश्यकता होती. हा करार धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा ठरला आहे. केवळ आर्थिक दृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक चांगले होती आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाला जागितक स्तरावर पाठिंबा मिळेल.