
Nicolas Maduro Arrest Venezuela election will be held trump's big announcement
Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर
नुकतेच मादुरो यांना अमेरिकेने सुनावणीसाठी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात हजर केले होते. यावेळी मादुरो यांनी ते निर्दोष असल्याचा आणि अजूनही व्हेनेझुएलाचे अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद केला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून १७ मार्च २०२६ ला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान मादुरो यांच्या पहिल्या सुनालणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी येत्या ३० दिवसांत व्हेनेझुएलात निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
NBC वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. यामुळे सध्या व्हेनेझुएलाच्या निवडणुका होणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, सध्या व्हेनेझुएलातमध्ये काही सुधारणांची आवश्यकता आहे. यानंतरच व्हेनेझुएलामध्ये निवडणुका होतील.
अमेरिकेने शनिवारी (०३ जानेवारी २०२६) ऑपरेशन अब्सोल्युट रिझोल्व अंतर्गत व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथून त्यांनी अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करुन अमेरिकेत आणण्यात आले. त्यांना अमेरिकेच्या डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले आहे.
या कारवाईनंतर ट्रम्प यांनी अमेरिका व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती सुधारणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यामध्ये व्हेनेझुएलातील तेल क्षेत्राचा विकास करण्याची योजना प्रथम आखण्यात आली आहे. यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. व्हेनेझुएलाकडे जगताली सर्वात मोठा तेल साठा आहे. परंतु येथील खराब धोरणे, निर्बंध आणि कमकुवत पायाभूत सुविधांमुळे तेल उत्पादनात घटन झाली आहे. ज्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आम्ही व्हेनेझुएलाशी युद्ध करत नसून तेथील ड्रग्ज तस्कर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरोधात हा लढा आहे.
परंतु तज्ज्ञांच्या मते अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याचे नियंत्रण मिळाल्यास अमेरिकन डॉलरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. शिवाय व्हेनेझुएलातील तेल हे हेवी मटेरियलचे असून यापूसन सर्व प्रकारच्या तेलाचे उत्पादन करता येते. हे तेलाचे साठ अमेरिकेच्या हाती लागल्यास अमेरिकेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. सध्या ट्रम्प यांनंतर आणखी एका देशावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे म्हटले जात आहे.
Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ
Ans: ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, व्हेनेझुएलातील परिस्थिती सध्या बिकट असून तेथे निवडणुका घेणे अशक्य आहे. यामुळे पुढील ३० दिवस व्हेनेझुएलात निवडणुका होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Ans: अमेरिका व्हेनेझुएलाची पुनर्बांधणी करणार असून पहिल्यांदा तेल क्षेत्राचा विकास करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी तेल क्षेत्रातील गुंतवणुकदारांना व्हेनेझुएलात गुंतवणूकाचे आवाहन करण्यात आले आहे.
Ans: मादुरोच्या अकटकेनंतर व्हेनेझुएलात सत्ता बदल झाला असून उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज देशाचा कारभार संभाळणार आहेत.