Nicolas Maduro : 'मी निर्दोष आहे...' ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
दरम्यान अमेरिकेने लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे आणि मी निर्दोष असल्याचे मादुरो यांनी म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार, सोमवारी (०५ जानेवारी) दुपारी १२.०१ वाजता त्यांना तुरुंगाच्या गणवेशात कोर्टरुमध्ये हजर करण्यात आले होते. त्यांना हातकड्या बांधून कडक सुरक्षेत नेण्यात आले होते.याचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अमेरिकेची एक सशस्त्र सुरक्षा टीम मादुरोंना एस्कॉर्टकरत कोर्टात नेत आहे. तसेच मादुरो यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनी देखील त्यांच्यासोबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील फेडरल कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना देखील मादुरोंसोबत हातकड्या बांधून आणण्यात आले होते.
दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर मादुरो यांना त्यांच्या वकिलांशी संवाद साधला. तसेच त्यांना भाषांतरासाठी हेडसेटही लावला होता.मादुरो यांनी सुनावणीदरम्यान काही नोंदी घेतल्या होत्या. या नोंदी ठेवण्यास त्यांना न्यायालयाने मंजूरी दिली होती. सरकारी वकिलांनीही आक्षेप घेतला नाही. दरम्यान मादुरो यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिकेने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहे. ते निर्दोष आहेत. तसेच त्यांनी असेही म्हटले की, मी अजूनही माझ्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. मादुरो यांनी म्हटले की, त्यांचे ३ जानेवारीला अपहरण करुन त्यांना न्यूयॉर्कमध्ये तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
Venezuela’s deposed leader Nicolas Maduro is escorted from a Manhattan Heliport, en route to his initial US federal court appearance in New York City, facing charges including narco-terrorism, drug trafficking, and money laundering https://t.co/G1UDMO3gjE 📷 @agrayphoto pic.twitter.com/8xDRLEMqot — Reuters Pictures (@reuterspictures) January 5, 2026
दरम्यान न्यायालयाने सिलिया फ्लोरिस आणि मादुरो यांच्या याचिका अधिकृतपणे रेकॉर्ड केल्या आहेत. आता पुढील सुनावणी ही १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे. निकोलस मादुरो यांची केस वकील बॅरी पोलॅक करत आहेत, तर सिलाय फ्लोरेस यांचे सुनावणी व्हाईट-कॉलर तज्ज्ञ मार्क डोनेली यांनी घेतली आहे.
सध्या व्हेनेझुएलामध्ये सत्ता हस्तांतरणाची प्रक्रियेची कार्य सुरु आहे. मादुरोच्या अटकेनंतर सत्ता उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या हाती देण्यात आली आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप उमटला आहे. तसेच चीन आणि इराणकडून मादुरोच्या तात्काळ सुटकेची मागणी केली जात आहे.
अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल






