Nimisha Priya's last hope gone Mehdi's family refuses to pardon sentence; Now death sentence inevitable
साना : भारतीय परिचारिका निमिषा प्रिया सध्या येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. १६ जुलै रोजी तिला फाशी देण्यात येणार होती. परंतु १५ जुलै रोजी तिच्या फाशीला स्थगिती दिली होती. यामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला होता.पंरुत कुटुंबीयांच्या आशेवर पुन्हा पाणी फेरले आहे. निमिषावर तिचा व्यावसायिक भागीदार तलाल महदी याच्या हत्येचा आरोप होता.
सध्या निमिषाला वाचवण्याच्या सर्व दिशा बंद झाल्या आहेत. ती गेल्या आठ वर्षांपासून येमेनच्या तुरुंगात महदीच्या हत्येच्या आरोपात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. निमिषाला १६ जुलै रोजी होणारी फाशी स्थगित करण्यात आली होती. परंतु भारताचे धार्मिक गुरुंच्या प्रयत्नांमुळे ही फाशी टळली होती. निमिषाच्या कुटुंबीयांनी पीडीताच्या कुटुंबाला ‘ब्लड मनी’ देण्याचे म्हटले होते. परंतु यावर पीडिताच्या कुटुंबाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. यामुळे फाशीली स्थगिती मिळली होती.
दरम्यान त्याच्या कुटुंबीयांनी निमिषाला माफ करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावर तलाल महदीच्या भावाकडून प्रक्रिया समोर आली आहे. निमिषाला तलाल महदीच्या हत्येसाठी त्याच्या भावाने जबाबदार ठरवले आहे. महदीचा भाऊ अब्देफत्ताह महदीने म्हटले आहे की, भारतीय परिचारिकेने केलेला गुन्हा माफी लायक नाही. निमिषाला फाशी दिली पाहिजे, तिने माझ्या भावाचा खूप केला आहे. तिचे कुटुंब आमच्यावर दबाव आणत आहे. गुन्हेगाराला पीडित म्हणून दाखवत आहे.
निमिषाला २०१७ मध्ये येमेनी व्यावसायिक भागीदाराची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याअंतर्गत तिला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ३८ वर्षी निमिषा ही केरळमधील पलक्कड जिह्ल्यात राहणारी आहे. येमेनच्या शिरीया न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती.
तिच्या केवळ पीडिताच्या कुटुंबाकडून आशा होती. येमेनच्या इस्लामिक कायद्यानुसार तिला माफी मिळेल असे वाटले होते. परंतु आता आशेचा हा दरवाजा देखील बंद झाला आहे. सध्या निमिषावर फाशीची टांगती तलावर अजूनही आहेच. या घटनेमुळे परदेशातील भारतीय नागिरकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहे.
सध्या परदेशात अनेक भारतीय कारागृहात शिक्षा भोगत आहेत. एकूण ५४ भारतीय नागिरकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वाधिक भारतीय म्हणजेच २९ जण संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) आहेत, तर सौदी अरेबियामध्ये १२, कुवैतमध्ये ३ आणि कतारच्या कारागृहात १ भारतीय आहे.