येमेनमध्ये 'या' गुन्ह्यांसाठी दिली जाते मृत्यूदंडाची शिक्षा; कैद्याची शेवटची इच्छा देखील राहते अपूर्ण
येमेनमध्ये भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला फाशी देण्यात येणार आहे. १६ जुलै रोजी तिला फाशी देण्यात येणार असून तिला वाचवण्यासाठी तिचे कुटुंबीय आणि भारत सरकार प्रयत्न करत आहे. तिच्या फाशीसाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. निमिषा प्रिया २०१७ पासून येमेनच्या तुरुंगात आहे. तिच्यावर तिचा सहकारी व्यावसायिक तलाल अब्दो महदी यांची हत्या करण्याचा आरोप आहे. पीडिताच्या कुटुंबाला तिच्या घरच्यांनी ब्लड मनी किंवा भरपाई रक्कम देण्याचे म्हटले आहे. परंतु अद्यार पीडिताच्या कुटुंबाकडून यासाठी संमती आलेली नाही. यामुळे सध्या ही फाशी थांबवण्यात आली आहे.
परंतु या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष येमेनच्या कठोर आणि वादग्रस्त न्यायव्यवस्थेकडे वेधले आहे. येमेन हा एक असा देशा आहे, जिथे मृत्यूदंडाची शिक्षा कायदेशीर रित्या आमंलात आणली जाते. येमेनमध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने मृत्यूदंड दिला जातो. सामान्य गुन्ह्यांमध्ये देखील फाशीची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे.
येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा, धर्मत्याग, समलैंगिकता, व्यभिचार, लैंगिक शोषण, वेश्यावृत्ती, देशद्रोह, दरोडा, खुन यांसारख्या गुन्ह्यांसाठी दिला जातो. या शिक्षेला आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचे उल्लंघन मानले जाते. परंतु येमेनमध्ये अद्यापही ही क्रूर शिक्षा दिली जाते.
येमेनमध्ये सर्वात क्रूर पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. येथे बंदुकीने छातीत गुन्हेगाराला गोळ्या मारल्या जातात. यामध्ये आरोपीला उलटे झोपवले जाते, त्याचे हात बांधले जातात. त्यानंतर वैद्याद्वारे हृदयाचे स्थान निश्चित केले जाते आणि एका अधिकाऱ्याकडून रायफलने पाच गोळ्या झाडल्या जातात. मरणापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा देखील विचारली जात नाही.
येमेनच्या उत्तर आणि उत्तर पश्चि भागात हुथी बंडखोराचे नियंत्रण आहे. या भागात मृत्यूदंड अधिक क्रूर पद्धतीने दिला जातो. या ठिकाणी फाशी देण्याची पद्धतही कायदेशी आहे. परंतु अनेकदा शिरच्छेद करुन किंवा दगड मारूननही गुन्हेगाराला ठार केले जाते. परंतु हे खूप कमी प्रकरणांमध्ये होचेय
सध्या निमिषाला वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी एकमेव मार्ग म्हणजे ब्लड मनी देऊ केली आहे. म्हणजे पीडिताच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाई स्वीकारली आणि संबंधित गुन्हेगाराला माफ केले तरच निमिषाचे प्राण वाचतील. परंतु सध्या महदी कुटुंबाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.