Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nirmal Purja: पर्वतांचा राजा हरपला! निर्मल पुर्जा यांच्यासह 5 गिर्यारोहकांचे मृतदेह स्कार्दूला आणले; 8 व्या दिवशीही शोधमोहीम सुरू

Skardu Pakistan News: पाकिस्तानमधील ब्रॉड पीक हिमस्खलनात ठार झालेल्या निर्मल पुर्जा यांच्यासह पाच गिर्यारोहकांचे मृतदेह विमानाने स्कार्दू येथे आणण्यात आले. सात मृतदेह सापडले असून, दोघे अद्याप बेपत्ता आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 06, 2026 | 08:29 PM
nirmal purja broad peak avalanche skardu bodies recovered marathi news

nirmal purja broad peak avalanche skardu bodies recovered marathi news

Follow Us
Follow Us:
  • पाच मृतदेह स्कार्दूला हलवले
  • आठव्या दिवशीही शोधमोहीम सुरू
  • पर्वतीय मार्गदर्शकांसाठी निधी संकलन

गिर्यारोहण क्षेत्रातील एक अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील जगातील १२ व्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजेच ब्रॉड पीकवर (Broad Peak) झालेल्या भीषण हिमस्खलनात प्राण गमावलेले प्रसिद्ध नेपाळी-ब्रिटिश गिर्यारोहक निर्मल पुर्जा (निम्स दाई) आणि त्यांच्या साथीदारांचे मृतदेह स्कार्दू येथे सुरक्षितपणे आणण्यात आले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत प्रतिकूल हवामान आणि अवघड चढाईचा सामना करत बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हे मृतदेह स्कार्दू येथील सीएमएच (CMH) रुग्णालयात पोहोचवले आहेत.

ही भीषण दुर्घटना ३० जुलै रोजी घडली होती, जेव्हा ४३ वर्षीय निर्मल पुर्जा यांच्या नेतृत्वाखाली १० जणांचे एक आंतरराष्ट्रीय पथक ६,६०० मीटर उंचीवर कॅम्प २ कडून कॅम्प ३ च्या दिशेने चढाई करत होते. अचानक आलेल्या भीषण बर्फाच्या वादळाने आणि हिमस्खलनाने (Avalanche) या संपूर्ण पथकाला आपल्या विळख्यात घेतले. या अपघातात निर्मल पुर्जा यांच्यासह अनेक अनुभवी पर्वतारोहकांचा दुर्दैवी अंत झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

अल्पाइन क्लब ऑफ पाकिस्तानकडून पुष्टी अन् कागदपत्रांची प्रक्रिया

पाकिस्तानच्या अग्रगण्य ‘डॉन’ (Dawn) या वृत्तपत्रातील अहवालानुसार, अल्पाइन क्लब ऑफ पाकिस्तानने (ACP) या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एसीपीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रॉड पीकवरील इतिहासातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक शोधमोहिमेनंतर निर्मल पुर्जा, वांग झोंग (चीन), निमा शेर्पा, ग्यालू शेर्पा आणि किल्ली पेंबा ‘किलू’ शेर्पा यांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या मदतीने स्कार्दू येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे.

कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या सर्व मृतदेहांना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे हलवले जाईल. तेथून सर्व गिर्यारोहकांचे मृतदेह मान-सन्मानाने त्यांच्या आपापल्या मायदेशी (स्वदेशी) पाठवण्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

आतापर्यंत ७ मृतदेह हाती, बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध वेगाने सुरू

एसीपीचे सरचिटणीस अयाझ शिग्री यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या भीषण अपघातानंतर आठव्या दिवशीही बचावकार्य आणि शोधमोहीम तीव्रतेने सुरू आहे. आतापर्यंत एकूण सात गिर्यारोहकांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून ते विमानाने स्कार्दूला आणण्यात आले आहेत.

The bodies of Nirmal Purja, Zhong Wang of China, Nima Sherpa, and Kilu Sherpa transported from Broad Peak Base Camp to Skardu by Pakistan Army helicopters. The bodies were recovered during the search operation and arrived safely at the base camp on Wednesday. pic.twitter.com/ROB3LpP57f — Jamil Nagri (@jamilnagri) August 6, 2026

credit – social media and Twitter

परंतु, पाकिस्तानी गिर्यारोहक सोहेल साखी आणि अमेरिकन महिला गिर्यारोहक सारा मॅलरी गेस हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. एसीपीच्या अधिकारी नायला कियानी यांनी स्पष्ट केले की, नवांग थिंदू शेर्पा यांचा मृतदेह बर्फात अडकलेला दिसला होता, परंतु अतिउंच ठिकाण, तीव्र उतार आणि धोकादायक हवामानामुळे तो बाहेर काढण्यात अत्यंत अडचणी येत आहेत.

‘निम्सदाई फाउंडेशन’कडून पीडित कुटुंबांसाठी जागतिक मदत निधी

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, निर्मल पुर्जा यांनी स्थापन केलेल्या ‘निम्सदाई फाउंडेशन’ (Nimsdai Foundation) या सामाजिक संस्थेने एक मोठा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या निष्णात पर्वतीय मार्गदर्शकांच्या (Sherpa Guides) कुटुंबीयांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी फाउंडेशनने ‘ब्रॉड पीक गाईड्स फॅमिली Support फंड’ (Broad Peak Guides Family Support Fund) सुरू केला आहे. या जागतिक निधी संकलन मोहिमेद्वारे जमा होणारी रक्कम थेट मृत शेर्पा आणि गाईड्सच्या अनाथ झालेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ

जगातील १४ सर्वोच्च शिखरांचा विक्रम अन् अपूर्ण राहिलेले स्वप्न

निर्मल पुर्जा हे केवळ एक गिर्यारोहक नव्हते, तर ते साहस आणि जिद्दीचे दुसरे नाव होते. माजी ब्रिटीश गोर्खा सैनिक आणि विशेष दलाचे (UKSF) जवान राहिलेल्या पुर्जा यांनी २०१९ मध्ये ‘प्रोजेक्ट पॉसिबल’ (Project Possible) अंतर्गत जगातील सर्व १४ आठ-हजारी (८,००० मीटरपेक्षा उंच) शिखरे केवळ ६ महिने आणि ६ दिवसांत सर करून जागतिक विक्रम रचला होता. त्यांच्या या अद्भुत प्रवासावर ’14 Peaks: Nothing Is Impossible’ ही जगप्रसिद्ध नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली आहे.

यावेळी ब्रॉड पीकवर चढाई करून जगातील सर्व १४ आठ-हजारी शिखरांवर दोनदा चढाई करणारा इतिहासातील पहिला मानव बनण्याचे त्यांचे महान ध्येय होते. याच स्वप्नाने प्रेरित होऊन ते ब्रॉड पीक मोहिमेवर निघाले होते. परंतु, नियतीला काही वेगळेच मान्य होते; ६,६०० मीटर उंचीवर आलेल्या एका विनाशकारी हिमस्खलनाने या महान पर्वतारोहकाचा प्रवास कायमचा थांबवला. त्यांच्या या जाण्याने जागतिक गिर्यारोहण विश्वावर कधीही भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title: Nirmal purja broad peak avalanche skardu bodies recovered marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Climbing
  • Mountaineer
  • World news

संबंधित बातम्या

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ
1

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप
2

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध
3

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध

Imran Khan Release: 27 सप्टेंबरला इस्लामाबादला घेराव; इम्रान खान यांच्यासाठी PTIचा पाकिस्तानात आरपारच्या संघर्षाचा इशारा
4

Imran Khan Release: 27 सप्टेंबरला इस्लामाबादला घेराव; इम्रान खान यांच्यासाठी PTIचा पाकिस्तानात आरपारच्या संघर्षाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.