Nirmala Sitharaman to visit the U.K., Austria from April 8 in between tariff war
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक व्यापर क्षेत्रात मोठे युद्ध सुरु आहे. याचा अनेक देशांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होत आहे. याच दरम्यान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. निर्मला सीतारमण 8 ते एप्रिल दरम्यान ब्रिटन आणि ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांत मंत्रीस्तरीय द्विपक्षीय बैठक होणार आहे. टॅरिफवॉरदरम्यान अर्थमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानाला जात आहे.
तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण 9 एप्रिल रोजी लंडमध्ये होणाऱ्या 13व्या भारत-यूके आर्थिक संवादाता (13th EFD)परिषदेतही सहभागी होणार आहेत. या परिषदेत त्या गुंणतवणूकदार आणि व्यासायिक मंत्र्यांशी संवाद साधतील.
13 व्या EFD बैठकीचे सह-अध्यक्षपदा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि UK चे चान्सलर संयुक्तपणे भूषवणार आहेत. ही परिषद एक महत्वाची द्विपक्षीय व्यासपीठ आहे. या परिषदेत आर्थिक सहकार्य, गुंतवणूक, वित्तीय सेवा, करविषयक बाबींसारख्या विविध पैलूंवर आधारित आहे. तसेच अर्थमंत्री UPI इंटलिंकिंगच्या बाबींवरही चर्चा करणार आहेत.
या परिषदेत भारत IFSC GIFT सिटी, गुंतवणूक, विमा आणि पेन्शन क्षेत्रातील सहकार्य, फिनटेक आणि डिजिटल अर्थव्यवस्ता आणि शाश्वत हवामान निधी उभारण्यावर भर देणार आहे.
यूके दौऱ्यादरम्यान अर्थमंत्री सीतारमण भारत-यूके गुंतवणूक गोलमेज परिषदेतही सहभागी होणार आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय संघटनांचे सीईओ, पेन्शन फंडाचे प्रमुख, विमा कंपन्या, बॅंका आणि वित्तीय संस्था उपस्थित असणार आहेत. ही परिषदत यूकेच्या व्यापर सचिवांसोबत होणार आहे.
ब्रिटनमधील परिषदेनंतर निर्मला सीतारमण ऑस्ट्रियासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अर्थमंत्री ऑस्ट्रियाच्या वरिष्ठ सरकारी नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच भारतासोबत ऑस्ट्रियाला सखोल गुंतवणूकीत सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ऑस्ट्रियन अर्तव्यवस्था, ऊर्जा आणि पर्यटन मंत्री वुल्फगॅंग हॅटमॅन्सडॉर्फरसोबत बैठकीचे सह-अध्यक्षत्व भूषवतील.
निर्मला सीतारमण भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापर करारांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देणार आहेत. दोन्ही देशांतील व्यापर आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने अर्थमंत्र्यांची ही भेट महत्वाची ठरणार आहे. तसेच भारत आणि ब्रिटनमधील FTA साठी करारावर आठ महिन्यांपासून स्थगित झालेली चर्चा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. या कराराचा उद्देश व्यापार दुप्पट किंवा तिप्पट करुन 40-60 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचा आहे.