चीनच्या कुरघोडी काही थांबेनात! सीमाभागांत करतोय लष्करी कवायत, भारत देणार प्रत्युत्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: चीन आणि भातमधील LAC करारांवर सध्या परिस्थिती स्थिर आहे, परंतु हा मुद्दा अतिसय संवदेनशील आहे. दरम्यान पुन्हा एकदा चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशाजवळ लष्करी कवायती सुरु केल्या आहेत. यामुळे भारत-चीन Lac करारात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने अरुणाचल प्रदेशाजवळ ल्हुंजे एअरबेस मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. ल्हुजें एअरबेस हा भारताच्या तवांद जिल्ह्याच्या अगदी जवळ असून 3 हजार 700 मीटर उंचीवरील तिबेटावर आहे.
तवांग हा धोरणात्क आणि धार्मिक दृष्टीकोनातून महत्वाचा असून चीनने तवांगला दक्षिणी तिबेट म्हणून दावा केला आहे. ल्हुंजे एअरबेसवर चीन नवे विमान शेल्टर, हॅंगर आणि मोठ्या पार्किंगच्या रचना उबारत आहे. यामुळे हा बेस मोठ्या ऑपरेशन्ससाठी पुन्हा सज्ज होत आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पश्चिम सीमेच्या लडाख भागामध्ये 2020 मधील गलवान युद्धनंतर चीन सध्या पूर्व सीमेवर लक्ष केंद्रित करत आहे. चीनने याचे स्पष्ट संकते 2022 मध्ये यांग्त्से येथे झालेल्या संघर्षातून दिला होता. त्यावेळी चीनने LaC जवळ होटन, शिगात्से, नारी गुनसा यांसारख्या एअरबेसचा विस्तार केला होता. सध्या ड्रॅगन ल्हुेंजवर भर देत आहे. या एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी मजबूत आश्रय बांधला जात आहे. या ठिकाणी चीनने विकसित केलेली J-20 स्टेल्थ फाइटर्स, H-6 बॉम्बर्स आणि WZ -7 ड्रोन सुरक्षित ठेवण्यासाठी कामकाज केले आहे.
भारतही चीनच्या एक पाऊल पुढे आहे. भारताने तेजपूर, चबुआ, हाशिमारा यांसरखे एअरबेस अधिक मजबूत केले आहेत. हाशिमाराहून उडणारे राफेल फायटर्स मेटिओर मिसाईल्स आणि अत्याधुनिक सेन्सर्स या ठिकाणी सज्ज केले आहे. तसेच भारताने सीमेवरील रस्ते व इतर पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. तसेच सिलिगुडी कॉरिडॉरजवळही भारताने S-400 एअर डिफेन्स संरक्षक कवच म्हणून तैन्त केले आहे. ही प्रणाली ड्रॅगच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी अधिक महत्वपूर्ण मानली जात आहे. सध्या ही वेळ भारतासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
शिवाय, चीनच्या या विस्तारामुळे भूतान आणि नेपाळसाठीही धोकादायक ठरु शकतो. चीनच्या सीमा तिबेटला लागून असून ल्हुंज एअरबेल भारताच्या संवेदनशील ठिकाणी म्हणजेच चिकन नेक जवळ आहे. चीनच्या या हालचाली दक्षिण चीन समुद्रात यापूर्वी केलेल्या हालचालींप्रमाणेच आहेत. चीनची सध्या रणनीती धार्मिक आणि भौगोलिक राजकारणाचा भाग असू शकते. भारतावर दबा टाकण्याची चीनने नवीन खेळी खेळली आहे.