North Korea accuses US of serious war crimes on the eve of Donald Trump's inauguration report
प्योंगयांग: डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारली. त्यानंतर अमेरिकेच्या संसदेत जोरदार पुनरागमन करत ट्रम्प यांनी अवघ्या 6 तासांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. याच दरम्यान ट्रम्प यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाच्या माध्यामांनी एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाबद्दल कोणताही उल्लेख नाही, तर उलट 150 ते 1953 दरम्यान झालेल्या कोरियन युद्धादरम्यान अमेरिकेच्या भूमिकेबद्दल सांगण्यात आले आहे.
या अहवालानुसार, उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी 1950 ते 1953 दरम्यान झालेल्या कोरियन युद्धादरम्यान अमेरिका युद्धगुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या रुलिंग वर्कर्स पार्टीच्या मुखपत्र “रोडोंग सिनमुन” या दैनिकाने एक लघु लेख प्रकाशित केला आहे. या लेखात म्हटले आहे की, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2025 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे शपथ घेतली.
अमेरिकेन युद्धगुन्ह्यांचा उल्लेख
मात्र, या शपथविधी सोहळ्याबद्दल कोणतीही विशेष प्रतिक्रिया देण्याऐवजी, उत्तर कोरियाने 1950 च्या कोरियन युद्धादरम्यान अमेरिकेने केलेल्या कथित अत्याचारांचा उल्लेख केला. समाचार पत्राने विद्यार्थ्यांचा एक फोटो प्रकाशित केला आहे यामध्ये तरुण विद्यार्थी अमेरिकेने कोरियन युद्धादरम्यान केलेल्या युद्धगुन्ह्यांविषयी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. या प्रकरणावर कोणतीही तांत्रिक टिप्पणी न करता, उत्तर कोरियाने अमेरिकेविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर कोरियाचे अमेरिकेविरोधी धोरण?
याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, त्यांनी उत्तर कोरियाच्या नेता किम जोंग उन यांच्यासोबत अभूतपूर्व शिखर परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी आपले संबंध महत्वाचे असल्याचे सांगितले होते. मात्र, सध्याच्या घडामोडींनी उत्तर कोरियाच्या अमेरिकेविरोधातील परराष्ट्र धोरणाला आणखी धार मिळाल्याचे दिसून येत आहे.
अमेरिका-उत्तर कोरिया संबंध तणावग्रस्त
दरम्यान, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेने मागील आठवड्यात सांगितले की, उत्तर कोरियाच्या अलीकडील क्षेपणास्त्र चाचण्यांचे उद्दिष्ट अमेरिकेला आव्हान देणे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष वेधणे होते. मागील महिन्यात उत्तर कोरियाने एका मोठ्या धोरण बैठकीत अमेरिकेविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची शपथ घेतली होती. या घडामोडींमुळे अमेरिका-उत्तर कोरिया संबंध पुन्हा एकदा तणावग्रस्त झाले असून, याचा पुढील परिणाम जागतिक स्तरावर कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.