North Korea benefits from the destruction in Europe Kim Jong-un's plan revealed
प्योंगयांग: सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया आणि नाटो देशांमध्ये तणाव वाढत आहे. तसेच अमेरिका देखील अनेक मुद्द्यांवर अडकला आहे. सध्या अमेरिकाचे अरब आणि युरोपिय देशांसोबत गाझा पुनर्बांधणीवरुन वाद सुरु आहेत. गाझाच्या पर्यटन स्थळ बनवण्याच्या योजनेला अरब आणि युरोप देशींनी तीव्र विरोध केला आहे. मात्र, या परिस्थितीचा फायदा उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन ला होत आहे.
उत्तर कोरिया युरोपमधील बिकट परिस्थितीचा फायदा घेत असून त्याी नजर आता अबर देशांवर खिळली आहे. किम जोंगन उन याने आपल्या गुप्त अणु प्रकल्पावर वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे.
किम जोंग उन चे सैन्याला मोठे आदेश
सध्या जगाचे लक्ष युरोपमधील संकटाकडे लागले असताना दुसरीकडे किम जोंग उन यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आण्वित शस्त्रसाठा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक विशेष तज्ज्ञ टीम निवडण्यात आली आहे. या टीमने गुप्त ठिकाणी अणु प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. उत्तर कोरियाच्या या निर्णयानं संपूर्ण युरोप आणि अमेरिकेची चिंता वाढली आहे.
रशियाची उत्तर कोरियाला मदत
गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसरा, रशियाकडून उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. उत्तर कोरिया रशियाला सैनिक आणि आधुनिक शस्त्र पुरवठा करत असून याबदल्यात रशिया किम जोंग उन च्या अणु कार्यक्रामांना सहकार्य करत आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाकडे सध्या 50 अणु शस्त्रांचा साठा आहे.
मात्र येत्या 10 वर्षात हा साठा 300 हून अधिक बनवण्याचा किम जोंग उनचा मानस आहे. असे झाल्यास उत्तर कोरिया 2035 पर्यंत ब्रिटनपेक्षा जास्त अणु शस्त्रे तयार करेल. सध्या ब्रिटनकडे 225 अणु शस्त्रांचा साठा आहे. ब्रिटनने जाहीर केले आहे की, ते 260 वर आपल्या साठा वाढवणार नाहीत.
अमेरिका आणि दक्षिण कोरियासाठी मोठा धोका
हुकुमशाह किम जोंग उन याने जगाला आधीच इशार दिला आहे. त्यांने सांगितले आहे की, त्याच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी अणु कार्यक्रम सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्यांने जगाला चेतावणी दिली आहे की, कोणी उत्तर कोरियाच्या अणु प्रकल्पांमध्ये अडथळा आणला तर, उत्तर कोरिया आण्विक पर्यायाचा वापर करने आणि त्यांना नष्ट करण्यात येईल.
उत्तर कोरियाचा सर्वात जास्त धोका दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला आहे. अमेरिकेने नेहमीच दक्षिण कोरियाच्या सुरक्षेची हमी दिली आहे. मात्र, सध्या अमेरिका अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांमध्ये गुंतलेली आहे. यामुळे उत्तर कोरिया याचा फायदा घेतल्यास दक्षिण कोरियाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
युरोपची चिंता
सध्या याचा सर्वात जास्त धोका युरोप आणि अरब देशांना आहे. युरोपच्या गुप्तचर संस्थांनी याकडे लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर कोरिया दिवसेंदिवस शक्तिशाली बनत चालला आहे. याचा परिणाम जागतिक स्तरावर होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि नाटो देशा यासाठी पावले उचलत आहे. मात्र, भविष्यात उत्तर कोरियाचे शक्तीप्रदर्शन जागतिक शांततेसाठी आव्हानत्मक ठरु शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इवलासा देश, सैन्यशक्ती मात्र अफाट! जगाचा विध्वंस करण्याची आहे ताकद