इवलासा देश, सैन्यशक्ती मात्र अफाट! जगाचा विध्वंस करण्याची आहे ताकद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सियोल: क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश म्हणून उत्तर कोरियाला ओळखले जाते. पण उत्तर कोरिया त्याच्या लष्करी ताकदीसाठी ओळखला जातो. या देशाची स्वत:ची एक वेगळी आणि शक्तीशाली लष्कर आहे. उत्तर कोरियाकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांचा प्राणघातक साठा देखील आहे. तसेच या देशाचे अनेक शत्रू देखील आहेत. उत्तर कोरियाचा सर्वात मोठ्या शत्रू म्हणून अमिकेला ओळखले जाते. किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा देश अमेरिकेसह अनेक देशांना सतत आव्हान देत असतो.
उत्तर कोरियाचे सैन्य बळ
उत्तर कोरियाच्या सैन्याला कोरियन पीपल्स आर्मी (KPA) म्हणून ओळखले जाते. उत्तर कोरियाच्या सैन्यात 13 लाख सैन्य, तर 6 लाखाहूंन अधिक राखीव सैन्य आहे. तसेच 57 लाख कामगार/शेतकरी लष्करात गार्डससारखे कार्य करतात. शिवाय, 17 ते 30 वयोगटातील प्रत्येक पुरुषांना 3 ते 12 वर्षे सैन्यात सेवा देणे बंधनकारक आहे. उत्तर कोरियाचे KPA चार भागांत विभागले आहे. लष्कर, हवाई दल, नौदल आणि सामरिक बल. सामरिक दलात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांचा समावेश आहे.
अणुशक्ती आणि क्षेपणास्त्र साठा
या देशाकडे जगातील काही देशांप्रमाणेच अण्वस्त्र साठा आहे. त्यांच्या क्षेपणास्त्रांची क्षमता अमेरिका आणि त्याच्या इतर शत्रूंराष्ट्रांना नष्ट करता येण्याइतकी आहे. उत्तर कोरियाकडे हायपसॉनिक मिसाइल आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल्स आहेत. अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रापासून संरक्षण करण्यासाठी उत्तर कोरियाला ही क्षेपणास्त्रे आहेत. उत्तर कोरिया आणि अमेरिकेत 1950 च्या दशकात मोठा संघर्ष झाला होता.
तेव्हापासून आक्रमणाच्या भितीने उत्तर कोरियाने आपली स्वत:ची संरक्षणव्यवस्था बळकट केली आहे. उत्तर कोरियाच्या कोरियन पीपल्स आर्मीच्या ताफ्यात 6 हजार 900 हून अधिक टॅंक आणि चिलखती वाहने आहेत. यामध्ये सोव्हिएत युनियनच्या काळातील T-34 टॅंकचे चिनी मॉडेल आणि स्वदेशी बनावटीचे चोनमा-हो व सोंगुन-हो टॅंकचाही समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणात तोफा, रॉकेट लॉन्चर्स आणि इतर शस्त्रेही आहेत.
वायु आणि नौदल ताकद
उत्तर कोरियाच्या वायु दलात 1.10 लाख सैन्य असून 400 हून अधिक लढाइ विमाने, 80 बॉम्बर्स आणि 200हून अधिक वाहतूक विमाने आहेत. मात्र, यातील अनेक विमाने सोव्हिएत काळातील आहेत. मात्र उत्तर कोरिया वायु दलाची ताकद वाढवण्यासाठी सतत नवीन उपायोजना करत असते.
उत्तर कोरियाच्या नौदल सेवेत 60 हजारहून अधिक नौसेनिक आहेत. तसेच 470 युद्धनौका देखील आहेत. शिवाय, 70 पाणबुड्या असून या जुन्या सौव्हिएत काळातील आहेत. तसेच अनेक लहान पाणबुड्यांचा देखील समावेश आहे.
उत्तर कोरियाची सायबर ताकद
मात्र, उत्तर कोरिया अलीकडच्या काळात सायबर हल्ल्यांवरही भर देत आहे. या छोट्या देशाकडे 6 हजार 800 हून अधिक प्रशिक्षित सायबर सैनिक आहे. हे अमेरिकसह अनेक देशांवर सायबर हल्ला करु शकतात. उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था त्याच्या शत्रू देशापेक्षा कमकुवत आहे, मात्र देशाचा GDPच्या 20 ते 30 % लष्करी खर्च केला जातो.
तसेच 2024 मध्ये उत्तर कोरियाने सरकारी खर्चाच्या 16% खर्च संरक्षणावर केला होता. उत्तर कोरियाची ही भक्कम सैन्यशक्ती अमेरिका आणि संपूर्ण जगाशी ताकदीने लढू शकते असे मानले जाते.