North Korea leader Kim Jong Un visits military training base fires news sniper rifle
प्योंगयांग: उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन पुन्हा एकदा आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करताना दिसले. यावेळी त्यांनी स्वत: हा मोर्चा सांभाळला. त्यांनी स्वत:हा देशात तयार होणाऱ्या नव्या स्नायपर रायफलचे परीक्षण केले. मिम जोंग स्वत: रायफल घेऊन मैदानावर उतरले. त्यांनी स्पेशल फोर्सच्या युनिट दौऱ्यादरम्यान रायफलचे परीक्षण केले. त्यांनी सैनिकांसोबत गोळीबार सरावात भाग घेतला. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्याच्या क्षमतेबद्दल जाणून घेतले आणि समाधान व्यक्त केले.
उत्तर कोरियाच्या सराकारी माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग यांनी शुक्रवारी (04 एप्रिल) स्पेशल ऑपरेशन्स युनिटमध्ये सहभागी घेत शस्त्रास्त्रांची पाहणी केली. त्यांनी म्हटले की, “वास्तविक युद्ध क्षमताच हीच युद्धातील विजयाची हमी असते, आणि ती प्रशिक्षणातूनच विकसित होते.” किम जोंगचे हे विधान अशा वेळी आले आहे, ज्यावेळी दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने दावा केला आह की, उत्तर कोरिया युक्रेनला रशियाविरुद्ध युद्धात हजारो सैनिक पाठवून मदत करत आहे.
किम जोंग उन यांनी हायटेक शस्त्रास्त्रांचे निरिक्षण केले. त्यांनी ऑटोमॅटिक रायफल आणि नवीन स्नायपर रायफलच्या गोळीबार सरावात सहभाग घेतला. स्वत:ही रायफलने गोळी झाडवी. या रायफलच्या अचूकता आणि क्षमतेबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. मीडिया रोपोर्टनुसार, ही अत्याधुनिक रायफल उत्तर कोरियातच तयार करण्यात आली आहे. किम जोंग यांनी अतिशय हायटेक पद्धतीचे शस्त्र तयार करुन घेतले आहे.
माध्यामांकडून प्रसिद्ध छायाचित्रांमध्ये किम तुम्ही पाहू शकता की, किम जोग उन स्वत: हा सैनिकांसोबत रायफल घेउन सराव करताना दिसत आहे. बुलेटचे लक्ष्य दाखवताना आमि सैनिकांना अभिवादन करताना दिसत आहे. याच दिवशी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना त्यांच्या पदावरुन बडतर्फ करण्यात आले. या पार्श्वभूमीवर किम जोंग यांचा दौरा लष्करी सामर्थच नाही तर राजकीय संदेश देणारा मानला जात आहे.
दरम्यान किम जोंग उनच्या या कृत्यामुळे उत्तर कोरियाची योजना नेमकी काय आहे? किम जोंग उन कोणावर हल्ला साधण्याचा प्रयत्न करत आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर कोरियाची लष्करी ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.