Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

North Korea : इराणनंतर उत्तर कोरियाचा ‘स्फोट’! किम जोंग-उनची अमेरिकेवर हल्ला करण्याची तयारी? ‘या’ चाचणीने व्हाइट हाऊस हादरलं

North Korea-US Tensions: किम जोंग उनने उत्तर कोरियाच्या नवीन शक्तिशाली घन-इंधन इंजिनची चाचणी घेतली आहे, जे अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेला भेदण्यास आणि २,५०० किलोटन शक्तीचा अणुहल्ला करण्यास सक्षम आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 29, 2026 | 11:27 AM
north korea solid fuel engine test kim jong un threatens usa 2500 kiloton 2026

north korea solid fuel engine test kim jong un threatens usa 2500 kiloton 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • किम जोंग-उन यांचा नवा ‘गेम चेंजर’
  • २,५०० किलोटनचा अणुहल्ला
  • ट्रम्प प्रशासनासमोर दुहेरी संकट

North Korea Solid Fuel Engine Test 2026 : जगाचे लक्ष सध्या इराण आणि इस्रायलच्या युद्धाकडे (North Korea Solid Fuel Engine Test) असतानाच, पूर्व आशियातून एक अत्यंत भीतीदायक बातमी समोर आली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी पुन्हा एकदा आपली लष्करी ताकद दाखवत अमेरिकेला थेट युद्धाचे आव्हान दिले आहे. उत्तर कोरियाने नुकतीच एका अशा ‘सॉलिड-फ्युएल’ (घन-इंधन) इंजिनची चाचणी केली आहे, जे अमेरिकेच्या जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेलाही भेदण्यास सक्षम आहे.

२,५०० किलोटन: विनाशाचा नवा आकडा

उत्तर कोरियाच्या सरकारी मीडिया ‘KCNA’ नुसार, किम जोंग-उन यांनी स्वतः उपस्थित राहून या प्रगत इंजिनची ‘ग्राउंड जेट’ चाचणी पाहिली. हे इंजिन कंपोझिट कार्बन फायबरपासून बनवलेले असून त्याची शक्ती २५०० किलोटन इतकी प्रचंड आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये केलेल्या चाचणीच्या तुलनेत ही शक्ती खूपच जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, २५०० किलोटन शक्तीचा अर्थ असा की, हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे (MIRV) वाहून नेऊ शकते. जर हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या दिशेने डागले गेले, तर त्यांच्या संरक्षण यंत्रणेला एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा शोध घेणे अशक्य होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘Welcome to Hell’ अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार; दिला मृत्यूचा संदेश, US ला भू-कारवाईचा निर्णय अंगलट येणार

घन-इंधन इंजिन इतके घातक का असते?

साधारणपणे अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये द्रव इंधन (Liquid Fuel) वापरले जाते, जे भरण्यासाठी बराच वेळ लागतो आणि उपग्रहाच्या माध्यमातून ते सहज शोधता येते. मात्र, किम जोंग-उन यांनी आता ‘घन-इंधन’ (Solid Fuel) तंत्रज्ञानावर भर दिला आहे. घन-इंधन असलेली क्षेपणास्त्रे प्रक्षेपणासाठी नेहमी तयार असतात आणि ती कुठेही हलवणे सोपे असते. यामुळे अमेरिकेला हे क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी शोधणे जवळपास अशक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे अमेरिकेसाठी ‘डेडली सरप्राईज’ ठरू शकते.

BREAKING: North Korea’s leader Kim Jong-un has overseen a ground test of a high-thrust solid-fuel missile engine using a composite carbon fiber material, saying that the test was a part of the North’s five-year plan to upgrade its strategic strike capabilities: state media pic.twitter.com/fbC5unZqpE — Insider Paper (@TheInsiderPaper) March 28, 2026

credit – social media and Twitter

इराण युद्ध आणि किम जोंग-उन यांची चाल

डोनाल्ड ट्रम्प प्रशासन सध्या इराणसोबतच्या संघर्षामुळे आणि तिथे झालेल्या लष्करी नुकसानामुळे दबावाखाली आहे. नेमकं याच संधीचा फायदा किम जोंग-उन घेत असल्याचे दिसते. संसदेत बोलताना किम म्हणाले की, “उत्तर कोरिया हे आता कायमस्वरूपी अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे.” त्यांनी अमेरिकेवर दहशतवादाला खतपाणी घातल्याचा आरोप करत, दक्षिण कोरियाविरुद्ध अधिक आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेला दोन आघाड्यांवर (इराण आणि उत्तर कोरिया) गुंतवून ठेवण्याची ही उत्तर कोरियाची मोठी रणनीती मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US AWACS: अमेरिकेचा ‘आकाशातील हेर’ इराणने पाडला! Prince Sultan Air Baseवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; 12 जवान रक्ताच्या थारोळ्यात

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी?

उत्तर कोरियाच्या या हालचालींमुळे कोरियन द्वीपकल्पात तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणमध्ये आधीच युद्ध सुरू असताना आता उत्तर कोरियाने अणुचाचण्यांचा धडाका लावल्यास जगाला महायुद्धापासून वाचवणे कठीण होईल. ट्रम्प प्रशासन यावर काय उत्तर देते, यावर आता जगाचे भवितव्य अवलंबून आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तर कोरियाच्या नवीन इंजिन चाचणीचे महत्त्व काय आहे?

    Ans: हे २५०० किलोटन शक्तीचे घन-इंधन इंजिन आहे, जे अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेला चकवा देऊन त्यांच्या मुख्य भूमीवर अणुहल्ला करण्यास सक्षम आहे.

  • Que: घन-इंधन क्षेपणास्त्रे अमेरिकेसाठी आव्हान का आहेत?

    Ans: ही क्षेपणास्त्रे अतिशय वेगाने डागली जाऊ शकतात आणि प्रक्षेपणापूर्वी ती रडार किंवा उपग्रहाद्वारे शोधणे अत्यंत कठीण असते.

  • Que: किम जोंग-उन यांनी अमेरिकेवर काय आरोप केले आहेत?

    Ans: किम जोंग-उन यांनी अमेरिकेवर मध्य-पूर्वेतील युद्ध भडकवल्याचा आणि जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.

Web Title: North korea solid fuel engine test kim jong un threatens usa 2500 kiloton 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • America
  • Kim Jong Un
  • North Korea
  • World War 3

संबंधित बातम्या

US AWACS: अमेरिकेचा ‘आकाशातील हेर’ इराणने पाडला! Prince Sultan Air Baseवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; 12 जवान रक्ताच्या थारोळ्यात
1

US AWACS: अमेरिकेचा ‘आकाशातील हेर’ इराणने पाडला! Prince Sultan Air Baseवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; 12 जवान रक्ताच्या थारोळ्यात

World War 3: ‘Welcome to Hell’ अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार; दिला मृत्यूचा संदेश, US ला भू-कारवाईचा निर्णय अंगलट येणार
2

World War 3: ‘Welcome to Hell’ अमेरिकन सैन्यासाठी शवपेट्या तयार; दिला मृत्यूचा संदेश, US ला भू-कारवाईचा निर्णय अंगलट येणार

US Protest : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका; ५० हून अधिक शहरांमध्ये No Kings ची घोषणाबाजी
3

US Protest : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका; ५० हून अधिक शहरांमध्ये No Kings ची घोषणाबाजी

India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा
4

India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.