"अमेरिकन सैनिक शवपेट्यांमध्ये परत येतील," असा इशारा देत इराणने अमेरिकेला म्हटले आहे, "नरकात आपले स्वागत आहे." ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Tehran Times Welcome to Hell headline : जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील (US-Israel Iran War) तणाव अशा टोकाला पोहोचला आहे, जिथून आता केवळ युद्धाचा धूर आणि रक्ताचा वास येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध भू-कारवाई (Ground Offensive) करण्याचे संकेत दिल्यानंतर इराणने आतापर्यंतचा सर्वात भीषण आणि क्रूर इशारा दिला आहे. इराणच्या सरकारी यंत्रणेचा आवाज मानल्या जाणाऱ्या ‘तेहरान टाइम्स’ने आपल्या मुखपृष्ठावर जे छापले आहे, त्याने संपूर्ण वॉशिंग्टन हादरले आहे.
शनिवारी प्रसिद्ध झालेल्या ‘तेहरान टाइम्स’च्या अंकाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. पहिल्याच पानावर एका मोठ्या मथळ्यात लिहिले होते “Welcome to Hell” (नरकात आपले स्वागत आहे). या लेखात अमेरिकन सैन्याला उद्देशून म्हटले आहे की, “इराणच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवणारा प्रत्येक अमेरिकन सैनिक केवळ शवपेट्यांमध्येच परत जाईल.” या इशाऱ्यासोबतच एका लष्करी विमानाकडे कूच करणाऱ्या सशस्त्र सैनिकांचे चित्र छापून इराणने आपल्या युद्धाच्या तयारीचे दर्शन घडवले आहे. इराणच्या ‘आयआरजीसी’ने (IRGC) आधीच स्पष्ट केले आहे की, त्यांचे सैनिक अमेरिकन सैनिकांची रणांगणात शिकार करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Ties: ‘तो तर फक्त ट्रेलर होता’ बालेन शाह ‘ॲक्शन मोडमध्ये येताच PM मोदींना पाठवला संदेश; वाचा नेमके काय म्हटले?
अमेरिकन माध्यमांतील वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन केवळ हवाई हल्ल्यांवर समाधान मानणार नाहीये. इराणने जमिनीखाली खोलवर असलेल्या सुरक्षित सुविधांमध्ये (Underground Facilities) साठवलेले युरेनियम हस्तगत करणे हे अमेरिकेचे मुख्य लक्ष्य आहे. हे साठे नष्ट करण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेला मोठ्या संख्येने पायदळ (Ground Troops) उतरवावे लागेल. वॉशिंग्टनमध्ये सध्या १०,००० अतिरिक्त सैनिक मध्य-पूर्वेकडे पाठवण्याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. जर हे सैनिक रणांगणात उतरले, तर हे युद्ध दशकभर चालणाऱ्या दीर्घकालीन संघर्षात रूपांतरित होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘WELCOME TO HELL’ A special issue of Tehran Times newspaper sends GREETINGS for US troops, preparing for possible ‘boots on the ground’ opetaion pic.twitter.com/i60C8AUDzp — RT (@RT_com) March 28, 2026
credit – social media and Twitter
हा इशारा इतका गांभीर्याने का घेतला जात आहे? याचे कारण ‘तेहरान टाइम्स’ या वृत्तपत्राची पार्श्वभूमी आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर स्थापन झालेले हे वृत्तपत्र इराणमधील कट्टरपंथी गटांशी घनिष्ठ संबंध राखून आहे. हे वृत्तपत्र म्हणजे इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा आणि सरकारचा अधिकृत आवाज मानला जातो. त्यामुळे, जेव्हा ‘तेहरान टाइम्स’ मृत्यूची भाषा करते, तेव्हा ती केवळ एक हेडलाईन नसून तो इराणच्या लष्करी धोरणाचा एक भाग असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा
एकीकडे ट्रम्प म्हणतात की तेहरान वाटाघाटींसाठी तयार आहे, तर दुसरीकडे इराण शवपेट्यांची भाषा करत आहे. या विसंगतीमुळे युद्धाचा पेच अधिकच वाढत चालला आहे. जर अमेरिकेने खरोखरच भू-हल्ला केला, तर इराण त्याला ‘नरकाचे द्वार’ बनवण्यास मागेपुढे पाहणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. या इशाऱ्यामुळे जागतिक शेअर बाजार आणि कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
Ans: 'तेहरान टाइम्स'ने "नरकात आपले स्वागत आहे" या शीर्षकाखाली इशारा दिला आहे की इराणच्या भूमीवर येणारे अमेरिकन सैनिक केवळ शवपेट्यांमध्येच परत जातील.
Ans: ट्रम्प प्रशासनाला इराणचा जमिनीखाली साठवलेला युरेनियम साठा हस्तगत करायचा आहे, ज्यासाठी १०,००० सैनिकांच्या तैनातीचा विचार सुरू आहे.
Ans: हे इराणमधील कट्टरपंथी गटांशी संबंधित आणि सरकार-नियंत्रित वृत्तपत्र असून ते इस्लामिक क्रांतीचा अधिकृत आवाज मानले जाते.






