चीनसोबत सुरु होणार भारताचा नवा अध्याय; पराराष्ट्रमंत्री वांग यी आणि डोवाल भेटीत 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा
नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज चीनला भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अजित डोवाल यांनी हा दौरा भारत आणि चीनमधील LAC संदर्भातील विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी आयोजित करण्यात आला आहे. या भेटीदरम्यान डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. 17 ते 18 डिसेंबर हा दौर असणार असून या दौऱ्याला भारत-चीन सीमेवरील दीर्घकालीन वाद सोडवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
भारत-चीन सीमेवरील शांतता व्यवस्थापन
बिंजींगमध्ये झालेल्या वांग यी यांच्या सोबतच्या बैठकीत पूर्व लडाखमधील लष्करी तणाव, भारत-चीन सीमेवरील शांतता व्यवस्थापन आणि दोन देशांदरम्यान गेल्या चार वर्षांपासून थांबलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या पुनर्बांधणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. वांग यी यांनी भारताबरोबर काम करण्याची तयारी दर्शवली.
डोवाल हे भारत आणि चीनमधील विशेष प्रतिनिधी स्तरावरील 23व्या फेरीच्या चर्चेसाठी बीजिंगमध्ये गेले होते.2019 नंतर प्रथमच ही चर्चा आयोजित करण्यात आली. या आधीची बैठक 2019 साली दिल्लीत झाली होती. बीजिंगमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता या चर्चेला सुरुवात झाली.
सीमेवरील तणाव आणि शांतता व्यवस्थापन
पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी ऑक्टोबर 2023 मध्ये एका सामंजस्यावर सहमती दर्शवली होती. या अनुषंगाने, सीमेवरील लष्कर मागे घेण्याबाबत आणि गस्तीसाठी सहकार्य करण्यासाठी अजित डोभाल आणि वांग यी यांना विशेष प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले. बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करत, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुधारण्याचे प्रयत्न करण्यात आले.
चीनची सहकार्याची तयारी
2019 नंतर पहिल्यांदाच भारताचा वरिष्ठ अधिकारी चीनच्या दौऱ्यावर गेला आहे. त्याआधी, 2019 मध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बीजिंगला भेट दिली होती. वांग यी यांनी या बैठकीत सांगितले की, चीन भारताच्या प्रमुख हितसंबंधांचा सन्मान करतो आणि परस्पर विश्वास मजबूत करण्यासाठी संवाद आणि सहकार्य वाढवण्यास तयार आहे.दोन्ही देशांनी एकमेकांच्या चिंतांचा आदर ठेवत प्रामाणिकपणे मतभेद सोडवण्यावर सहमती दर्शवली. चीनने स्पष्ट केले की, द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ते भारताबरोबर काम करण्यास तत्पर आहेत.
भारत-चीनचा नवीन अध्याय
NSA अजीत डोभाल यांचा आजचा चीन दौरा तसेच विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक, भारत-चीन सीमावादाच्या शांततामय तोडग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. चीनने भारताला सहकार्याची तयारी दर्शवली असल्याने या उच्चस्तरीय चर्चेतून सीमावादावर स्थायी तोडगा काढण्यासाठी पुढील दिशानिर्देश मिळू शकतील. या चर्चेच्या यशस्वीतेमुळे LAC वरील तणाव कमी होऊन, भविष्यातील द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याची दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.