फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षापासून इस्त्रायल-हमास युद्ध सुरु असून युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, इस्त्रायलने पुन्हा एकदा या कराराचे उल्लंघन केले आणि गाझातील हमासाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली.आत्तापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक पॅलेस्टिनी लोकांनी जाव गमवला आहे. यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे.
अमेरिकेचे फेडरल कायद्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी
दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझा वेस्ट बॅंक आणि अमेरिकेत राहणाऱ्या काही पॅलेस्टिनी नागरिकांनी अमेरिकेवर खटला दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इस्त्रायलला समर्थन दिल्याने तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे आरोपात म्हटले आहे. हा खटला मंगळवारी (17 नोव्हेंबर) ला घोषित करण्यात आला. या खटल्यात अमेरिकेचे फेडरल कायद्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राज्यविभागावर केला आहे.
7 ऑक्टोंबर रोजी युद्धाला सुरूवात
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 हून अधिक लोक मारले गेले आणि 100 हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रायलने देखील हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिले आणि युद्धाला सुरवात झाली. युद्धाच्या सुरूनातीपासून यामध्ये अनेक पॅलेस्टिनी नागरिकांनी जबरदस्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. यामुळे यामध्ये अनेक पॅलेस्टिनी कुटूंबांच्या सदस्यांचा मृत्यू झाला.
अमेरिकेने इस्त्रायल लष्करी मदत बंद करावी
पॅलेस्टिनी कुटूंबींयांतील एका सदस्याने म्हटले आहे की, अमेरिका इस्रायलला लष्करी मदत बंद करेल तेव्हाच त्यांच्या वेदना कमी होतील. अमेरिका इस्त्रायलला शस्त्रे पुरवून मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. तसेच यूएस सरकार परकीय लष्करी युनिट्सना निधी देण्यापासून ते गंभीर मानवी हक्क उल्लंघनात गुंतलेले आहे. यामुळे अमेरिकेने इस्त्रायलची लष्करी मदत बंद करण्याची मागणी केली जात आहे. मात्र,अद्याप अमेरिकेनेयावर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
आत्तापर्यंतची अमेरिकेची इस्त्रायलला मदत
यूएस स्टेट डिपार्टमेंटने याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्या उल्लंघनांमध्ये छळ, हत्या, जबरदस्तीने बेपत्ता होणे आणि बलात्कार यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दरवर्षी अमेरिका इस्रायलला किमान US$3.8 बिलियन सैन्य मदत पुरवते. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून बायडेन प्रशासनाने अतिरिक्त US$17.9 अब्ज डॉलर्सची मदत इस्त्रायलला केली आहे. यामुळे ट्रम्पच्या कार्यकाळात इस्त्रायल-हमास युद्ध काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.