
US conducted Operation Hawkeye Strike in Syria
ट्रम्पची सीरियावर कृपा! अमेरिकेने हटवले सर्व कठोर निर्बंध
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर २०२५ रोजी सीरियातील अमेरिकन तळावर झालेल्या हल्ल्याच्या बदल्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक अमेरिकन दुभाषीकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी याचा बदला घेतला जाईल हे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा अमेरिकेने नुकतेच सीरियावरील सर्व कठोर निर्बंध हटवले होते. सीरियाने या निर्णयाबद्दल अमेरिकेचे आभारही मानले होते.
ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक हे अमेरिकेच्या गृह राज्य आयोवाच्या समर्थनार्थ करण्यात आले आहे. आयोवा राज्याला हॉकऑय स्टेट म्हणून ओखळले जाते. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी सोशल मीडियावर या संबंधित माहिती दिली. त्यांनी म्हटले की, या मोहिमेचा उद्देश ISIS च्या दहशतवाद्यांना, त्यांचा शस्त्रांना आणि ऑपरेशन पायाभूत सुविधांना पूर्णपणे नष्ट करणे आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, हा सीरियातील नागरिकांवर नव्हे, तर त्यांच्या सैन्यावर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात हल्ला आहे.
CENTCOM forces launched fighter jets, attack helicopters and other assets to conduct the large-scale strike. pic.twitter.com/3szSo2u5rm — U.S. Central Command (@CENTCOM) December 19, 2025
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या या ऑपरेशनमध्ये लढाऊ विमाने, लढाऊ आणि हल्लेखोर हेलिकॉप्टर्स, आणि तोफखानांचा, गोळाबारुदांचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, सीरियात ISIS च्या १०० हून अधिक हल्ले करण्यात आले असून ७० हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. ISIS च्या प्रशिक्षण केंद्रांना, शस्त्र साठ्याच्या ठिकाणांना, ऑपरेशन इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे. या कारवाईच जॉर्डनने देखील अमेरिकेला मदत केली आहे.
Earlier today, U.S. forces commenced OPERATION HAWKEYE STRIKE in Syria to eliminate ISIS fighters, infrastructure, and weapons sites in direct response to the attack on U.S. forces that occurred on December 13th in Palmyra, Syria. This is not the beginning of a war — it is a… — Secretary of War Pete Hegseth (@SecWar) December 19, 2025
Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला
Ans: अमेरिकेने सीरियात दहशतावादी संघटना ISIS विरोधात सुरु केलेली लष्करी कारवाई म्हणजे ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक आहे.
Ans: १३ डिसेंबर २०२५ रोजी सीरियातील अमेरिकन तळावर हल्ला झाला होता, या हल्ल्यात २ सैनिक आणि एक दुभाषिक ठार झाला होता. याचा संबंध ISIS शी जोडला गेला आणि त्याविरोधात अमेरिकेने सीरियात ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक लॉन्च केले.
Ans: अमेरिकेने ऑपरेशन हॉकआय स्ट्राइकमध्ये ISIS ची ७० हून अधिक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली.
Ans: अमेरिकेने ऑपरेशन हॉकआय स्ट्राइकमध्ये लढाऊ विमाने, लढाऊ आणि हल्लेखोर हेलिकॉप्टर्स, आणि तोफखानांचा, गोळाबारुदांचा वापर केला आहे.
Ans: ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक हे अमेरिकेच्या गृह राज्य आयोवाच्या समर्थनार्थ करण्यात आले आहे. आयोवा राज्याला हॉकऑय स्टेट म्हणून ओखळले जाते.