ट्रम्पची सीरियावर कृपा! अमेरिकेने हटवले सर्व कठोर निर्बंध (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर ISIS चा हल्ला ; ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त, म्हणाले…
धक्कादायक बाब म्हणजे, ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात २०१९ मध्ये सीरियावर बंदी घातली होती. २०११ मध्ये सीरियात गृहयुद्धाला सुरुवात झाली होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर असद यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याने सीरिया सरकार वर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. दरम्यान डिसेंबर २०२४ मध्ये HTS च्या बंडखोर गटाने बशरच्या सत्तेविरोधात धावा बोलला आणि त्याची सत्ता उलटून टाकली.
त्यानंतर HTS गटचा प्रमुख अल-जुलानी यांनी सत्ता हाती घेतली. तेव्हापासून सीरियाच्या विकासासाठी ते प्रयत्न करत आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांची सौदी अरेबिात भेट घेतली होती. अमेरिका दौऱ्याचेही त्यांना आमंत्रण दिले होते. सध्या सीरियावरील निर्बंध हटवले जाक असून त्याच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न सुरु आहे. अमेरिकेने निर्बंध हटवल्याने सीरियामध्ये पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यास सुरुवात होईल. तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकही वाढेल.
ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत सीरियावरी निर्बंध तात्पुरते उठवले होते, परंतु गुरुवारी (१८ डिसेंबर) त्यांनी सीरियावरील निर्बंध उठवण्याच्या निर्णयाला अंतिम मान्यत दिली आहे. याला काही सुन्नी मुस्लिमांनी विरोध करण्याचा, अटी ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु सीरियावरील सर्व निर्बंध बिनशर्त हटवण्यात आले आहे. मात्र अद्यापही दहशतवादविरोधी उपाय आणि अल्पसंख्यांकाच्या हक्कांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. सीरियाने म्हटले आहे की, सीरियन लोकांवरील ओझे कमी करण्यासाछी आणि त्याच्या स्थिरतेसाठी, पुनर्बांधणीसाठी एक नवा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल अमेरिकेचे आभार मानतो. तसेच सीरियामध्ये परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचे आवाहन करतो असे सीरियाने म्हले आहे.
याशिवाय अमेरिकेसोबत ब्रिटनने देखील सीरियावरील वित्तीय संस्थांवरील सर्वसमावेश निर्बंध उठवले आहेत. परंतु नागरिकांविरोधात हिंसाचारात सहभागी असलेवल्या संघटना आणि व्यक्तींवरी कठोर निर्बंध लादले आहेत. दरम्यान सौदी अरेबिया आणि तुर्की, कतारने अमेरिका आणि ब्रिटनच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेत.
दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?
Ans: सीरियामध्ये बशरच्या सत्तापालटानंतर नवीन सरकारला पुनर्बांधणीसाठी अडथळा येत होता, परंतु अमेरिकेने निर्बंध हटवत हे सर्व अडथळे दूर केले आहेत. यामुळे सीरियात गुंतवणूक वाढेल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल.
Ans: अमेरिकेने सीरियावरील हटवलेल्या निर्बंधामुळे सीरियाच्यामध्ये आर्थिक गुंतवणूक वाढेल, तसेच युद्धग्रस्त देशाच्या पुनर्बांधणीसाठी गती मिळेल.






