Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानवर गहिरे संकट; भारताकडून पराभवानंतर इराणकडून मोठे पाऊल, सीमा सील करण्यास सुरुवात

Pakistan Iran border tensions : पाकिस्तानसाठी एकामागून एक संकट उभं राहत आहे. भारताकडून झालेल्या लज्जास्पद पराभवानंतर पाकिस्तानवर आता त्याच्या शेजारी देशांचा दबाव वाढताना दिसत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 24, 2025 | 11:28 AM
Pakistan After defeat by India Iran takes big step starts sealing borders

Pakistan After defeat by India Iran takes big step starts sealing borders

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan Iran border tensions : पाकिस्तानसाठी एकामागून एक संकट उभं राहत आहे. भारताकडून झालेल्या लज्जास्पद पराभवानंतर पाकिस्तानवर आता त्याच्या शेजारी देशांचा दबाव वाढताना दिसत आहे. आधीच अफगाणिस्तानसोबत तणावाच्या स्थितीत असलेल्या पाकिस्तानला आता इराणकडूनही कठोर कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

इराणने आपल्या सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये सुरक्षेचा बालेकिल्ला उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पाकिस्तानसोबतची आंतरराष्ट्रीय सीमा भिंतीद्वारे सील करण्याचे काम सुरू झाले आहे. इराणने यासाठी चार मीटर उंच आणि सुमारे ३०० किलोमीटर लांबीची भिंत उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जी दहशतवाद, इंधन तस्करी आणि ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी उभारली जात आहे.

पाकिस्तान, दहशतवाद्यांचा पुरवठादार?

इराणने वारंवार पाकिस्तानवर आरोप केले आहेत की, पाकिस्तानमधून अनेक दहशतवादी गट इराणच्या सीमेत घुसतात आणि हल्ले करतात. विशेषतः जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेने इराणमध्ये अनेक हल्ले घडवून आणल्याचे आरोप आहेत.

जानेवारी २०२४ मध्ये इराणने पाकिस्तानच्या सीमापार जाऊन जैश अल-अदलच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला होता. या घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. पाकिस्तानने या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना त्याला “बेकायदेशीर” ठरवले होते आणि “गंभीर परिणामांची” चेतावणी दिली होती. परंतु, दावोस येथील आंतरराष्ट्रीय मंचावर बोलताना इराणचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांनी स्पष्ट केले की, हल्ल्यात कोणतेही पाकिस्तानी नागरिक लक्ष्य करण्यात आले नाहीत, तर केवळ दहशतवादी गटाच्या सदस्यांवरच कारवाई करण्यात आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जाऊ देऊ नका, त्याला पकडून…’ मोहम्मद युनूसच्या राजीनाम्याच्या खबरीवर तस्लिमा नसरीन कडाडल्या

भिंत उभारणीमागे सुरक्षा आणि स्वाभिमान

इराणच्या सुरक्षाविषयक अधिकाऱ्यांच्या मते, इराणमध्ये होणाऱ्या ८० टक्के ड्रग्ज तस्करी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमांवरून होते, आणि दहशतवाद्यांच्या चळवळीही त्याच मार्गाने सक्रिय आहेत. त्यामुळे भिंत उभारणे ही केवळ भौगोलिक सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. या भिंतीचे बांधकाम सिस्तान-बलुचिस्तानच्या दक्षिणेकडील भागात आणि रझावी खोरासान प्रांतात सुरू झाले आहे. इराणच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेनुसार, ही भिंत पूर्ण झाल्यानंतर सीमाभागातील बेकायदेशीर हालचालींना मोठा आळा बसेल.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा डागाळते

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालयानेही जैश अल-अदलला एक प्रभावशाली दहशतवादी संघटना घोषित केले आहे, जी सिस्तान-बलुचिस्तानमध्ये सक्रीय आहे. वॉशिंग्टन आणि तेहरान या दोघांनीही याचे धोकादायक स्वरूप मान्य केले आहे. या सगळ्या घटनांमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा आणखी मलीन होत आहे. एकीकडे भारताशी झालेल्या सैनिकी पराभवाने त्याचा आत्मविश्वास डळमळीत केला आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तान आणि इराणसारखे शेजारी देश त्याच्याविरोधात उभे राहत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताची जागतिक दौऱ्यावर कूच; शशी थरूर अमेरिकेत करणार पाकिस्तानचा पर्दाफाश, ओवैसी आखाती देशांमध्ये गरजणार

 पाकिस्तानला चहूकडून फटकार

आज पाकिस्तान तिहेरी कोंडीत सापडला आहे. भारताशी युद्धजन्य स्थिती, अफगाणिस्तानकडून सीमावर्ती तणाव, आणि आता इराणकडून थेट भिंत उभारणीसारखे कठोर पाऊल. या सगळ्याचा मुख्य कारण पाकिस्तानमधून होणारी दहशतवादी हालचाल आणि तस्करी आहे, जी आता त्याच्या शेजारी देशांना असह्य झाली आहे. इराणचा हा निर्णय फक्त सीमाभागापुरता मर्यादित न राहता पाकिस्तानविरोधी एक जागतिक भूमिका तयार करू शकतो, आणि त्यामुळे पाकिस्तानवर पुढील काळात आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Pakistan after defeat by india iran takes big step starts sealing borders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • india pakistan war
  • iran
  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
1

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
2

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता
3

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान
4

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.