Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Shift: बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम

India Nuclear Policy: SIPRI अहवालाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की भारताने जमिनीवरून (क्षेपणास्त्रे), हवेतून (लढाऊ विमाने) आणि समुद्रातून (पाणबुड्या) अणुहल्ले करण्याची मजबूत क्षमता प्राप्त केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 07, 2026 | 01:10 PM
sipri report 2025 india nuclear policy shift 180 warheads china threat

sipri report 2025 india nuclear policy shift 180 warheads china threat

Follow Us
Follow Us:
  • धोरणात्मक बदल
  • अण्वस्त्र साठ्यात वाढ
  • अणु-त्रयी (Nuclear Triad) अधिक भक्कम

SIPRI Yearbook 2025 India nuclear report : जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) च्या २०२५ च्या ताज्या अहवालाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, भारताने आपल्या अण्वस्त्र धोरणात (India Nuclear Doctrine) एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक बदल केला आहे. आतापर्यंत शांततेच्या काळात भारत आपली अण्वस्त्रे (Warheads) आणि क्षेपणास्त्रे (Launchers) वेगळी ठेवत असे. मात्र, बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे भारताने आता ही शस्त्रे एकमेकांना जोडून सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून कोणत्याही हल्ल्याला काही सेकंदात प्रत्युत्तर देता येईल.

‘कॅनिस्टराईज्ड’ क्षेपणास्त्रे आणि तात्काळ प्रतिसाद

SIPRI च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारत आता आपली क्षेपणास्त्रे विशेष ‘कॅनिस्टर’मध्ये साठवत आहे. याचा तांत्रिक अर्थ असा की, क्षेपणास्त्रावर अणुबॉम्ब आधीच बसवलेला असतो आणि ते कोणत्याही क्षणी डागण्यासाठी तयार असते. याला ‘रेडी टू फायर’ स्थिती म्हणतात. भारताचे ‘अग्नी-५’ आणि ‘अग्नी प्राईम’ सारखी प्रगत क्षेपणास्त्रे याच तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यामुळे भारताची ‘सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी’ म्हणजेच शत्रूच्या पहिल्या हल्ल्यानंतरही शत्रूला उद्ध्वस्त करण्याची क्षमता कैक पटीने वाढली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

पाकिस्तानला मागे टाकले, आता चीनवर निशाणा

अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत भारताकडे एकूण १८० अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत. गेल्या एका वर्षात भारताने आपल्या साठ्यात ८ ते १० अण्वस्त्रांची भर घातली आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारताचे लक्ष आता केवळ पाकिस्तानवर मर्यादित राहिलेले नाही. भारताने आता अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत जी चीनच्या उत्तरेकडील टोकापर्यंत मारा करू शकतात. यामध्ये ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत यशस्वी चाचणी केलेल्या ‘MIRV’ तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे, ज्याद्वारे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक शहरांवर एकाच वेळी अणुहल्ला करता येतो.

The 9 nuclear-armed states —🇺🇸🇷🇺🇬🇧🇫🇷🇨🇳🇮🇳🇵🇰🇰🇵🇮🇱— together possessed an estimated 12 241 warheads at the start of 2025.
Download this chapter of #SIPRIYearbook 2025 on world nuclear forces to learn more about nuclear weapon stockpiles: https://t.co/MAngslwHZi#NewSTART… pic.twitter.com/DZIadvH4LZ
— SIPRI (@SIPRIorg) February 6, 2026

credit – social media and Twitter

दोन आघाड्यांवरील युद्धाची तयारी?

तज्ज्ञांच्या मते, गलवान संघर्ष आणि पाकिस्तानच्या सीमेवरील वाढत्या कुरापतींमुळे भारतीय धोरणकर्त्यांना आपली ‘नो फर्स्ट युज’ (आधी वापर नाही) ही भूमिका कायम ठेवूनही अधिक आक्रमक सज्जता ठेवणे भाग पडले आहे. आयआयपीएचे प्राध्यापक डॉ. मनन द्विवेदी यांच्या मते, जग एका नवीन शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत ओढले जात आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-इराण युद्धांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारताला आपली अण्वस्त्र त्रयी (Nuclear Triad) अधिक ‘लाईव्ह’ आणि सक्रिय ठेवावी लागत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamabad Blast: काश्मीरचा पाकिस्तानला शेवटचा सलाम? बारामुल्ला ते श्रीनगर.. रस्त्यावर फक्त एकच घोषणा, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’

समुद्रातून अणुहल्ल्याची ताकद

भारताने समुद्रावर आधारित अण्वस्त्र सज्जतेवर (Sea-based Deterrence) अधिक भर दिला आहे. आयएनएस अरिहंत आणि नवनियुक्त आयएनएस अरिघात या अण्वस्त्रधारी पाणबुड्या सातत्याने गस्त घालत आहेत. या पाणबुड्यांवर तैनात असलेली के-१५ आणि के-४ ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे भारताला शत्रूच्या नजरेत न येता खोल समुद्रातून हल्ला करण्याची अफाट शक्ती देतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'कॅनिस्टराईज्ड' क्षेपणास्त्र (Canisterised Missile) म्हणजे काय?

    Ans: यामध्ये क्षेपणास्त्र एका बंद कंटेनरमध्ये अण्वस्त्रासह साठवले जाते, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकते आणि युद्धाच्या वेळी अतिशय कमी वेळात डागता येते.

  • Que: भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का?

    Ans: होय, SIPRI २०२५ अहवालानुसार भारताकडे अंदाजे १८० अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत.

  • Que: भारताचे 'नो फर्स्ट युज' (No First Use) धोरण बदलले आहे का?

    Ans: अधिकृतपणे भारताचे धोरण बदललेले नाही, परंतु अण्वस्त्रे क्षेपणास्त्रांना जोडून ठेवल्यामुळे भारताची प्रत्युत्तर देण्याची गती (Response Time) प्रचंड वाढली आहे.

Web Title: Sipri report 2025 india nuclear policy shift 180 warheads china threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • india pakistan war
  • LAC India China
  • Nuclear missiles
  • World War 3

संबंधित बातम्या

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
1

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

World War 3: युक्रेन युद्धातून तोडगा न निघाल्यास पुतीन सुरु करणार तिसरे महायुद्ध; ‘हे’ NATO देश रडारवर, अमेरिकेचा दावा
2

World War 3: युक्रेन युद्धातून तोडगा न निघाल्यास पुतीन सुरु करणार तिसरे महायुद्ध; ‘हे’ NATO देश रडारवर, अमेरिकेचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.