
Pakistan-Afghanistan War
तालिबान सरकारने दावा केला आहे की, पाकिस्तानने कुनार आणि पक्तिका प्रदेशाच छाप टाकले आहे. या छाप्यात चार नागरिक जखमी झाले आहेत. तर गरबाज जिल्ह्यातील मुगलगाई भागात एका घरावर बॉम्ब डागण्यात आला आहे. यामध्ये पाच मुले, चार मुली आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या यावर पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये सुरुक्षा कर्मचारी त्यांच्या सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जात आहे. समोवारी सकाळी पाकिस्तानच्या पेशावर (Peshawar) येथील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तीन सुरक्षा रक्षक आणि तीन हल्लेखोर ठार झाले होते. तर अनेक जण जखमी झाले होते.
पाकिस्तानच्या पेशावर येथील हल्ल्याची जबाबादीर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. आत्मघातकी विस्फोटानंतर काही तासांच टीटीपीने हा हल्ला केल्याचे कबुल केले होते. या हल्ल्याचा भयावह व्हिडिओ देखील समोर आला होता.
गेल्या काही महिन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघर्षात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकामक झाली होती. यामध्य डझनभर लोक मारले गेले होते. २०११ नंतर तालिबान सत्ते आल्यापासून हा संघर्ष सुरु आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये दोन्ही देशात युद्धबंदी लागू करण्यात आली होती, परंतु या नंतरच्या शांतता चर्चेत तणावाचे कोणतेही निराकरण झाले आहे. दोन्ही देशांमध्ये मतभेद कायमस्वरुपी राहिला.
पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे, परंतु काबुलने हा दावा फेटाळून लावला आहे. शिवाय २०११ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेची साथ दिली होती. तेव्हापासून दोन्ही देशातील तणावात प्रचंड वाढ झाली. अफगाणिस्तानच्या मते पाकिस्तान खोट्या इस्लामाचा प्रचार करतो.
Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्ध पुन्हा भडकणार? इस्तंबूलमधील शांतता चर्चा अयशस्वी; सीमावाद कायम
Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये गरबाज जिल्ह्यातील मुगलगाई भागात एका घरावर बॉम्ब डागण्यात आला आहे.
Ans: पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हल्ल्यात ९ लहान मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे.