
pak afghan border standoff continues
Pak-Afghan War : इस्लामाबाद/काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तामध्ये (Afghanistan) सीमावादावर पुन्हा संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन्ही देशात तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा पार पडली. पण या चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे आता पुन्हा युद्ध भडकणार असे म्हटले जात आहे. ही दोन्ही देशातील तिसरी फेरी होती.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या महिन्यात संघर्ष सुरु झाला होता. यावेळी तुर्कीने मध्यस्थी करुन दोन्ही देशांत तात्पुरती युद्धबंदी लागू केली होती. यादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले देखील केले. दरम्यान नुकतीच दोन्ही देशांतील तिसरी बैठक पार पडली. पण ही बैठक अपयशी ठरली आहे. यामुळे वातावरण अजून तापले आहे. पुन्हा युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी युद्धाचा इशारा आधीच दिली होता. त्यांनी म्हटले होते की, तालिबूानसोबतची बैठक निष्फळ ठरली, तर युद्ध होईल. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान नुकत्या झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने आता तीव्र युद्ध पेटणार असे म्हटले जात आहे. शिवाय चर्चा अयशस्वी झाल्यानंतरही पाकिस्तानने इशारा दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आपल्या लोकांचे आणि सार्वभौमत्त्वाचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तान ठोस पावले उचलले. पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह यांनी सांगितले की, दहशवाद नियंत्रित करण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रादेशिक आणि द्विपक्षीय वचनबद्धता पूर्ण करण्याची जबाबदारी तालिबानवर आहे. परंतु ती त्यांनी पूर्ण केलेली नाही. जे अफगाण नागरिक आणि त्यांच्या शेजारील देशांसाठी धोकादायक असेल असे अत्ताउल्लाह यांनी म्हटले.
सध्या पाकिस्तानने पुढील चर्चेचासाठी सहमती दर्शवलेली नाही. आसिफ ख्वाजा यांनी पाकिस्तानचा चौथ्यांदा अशी निष्फळ चर्चा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय तणावावर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
का सुरु आहे दोन्ही देशात वाद?
पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे, परंतु काबुलने हा दावा फेटाळून लावला आहे. शनिवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले, तेव्हा सीमापार हिंसाचारात नाट्यमय वाढ झाली.
त्यांच्या आगमनानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये स्फोट झाले. त्यानंतर तालिबानने पाकिस्तानला लागून असलेल्या दक्षिण सीमेच्या काही भागात हल्ले सुरू केले, ज्याला इस्लामाबादकडून तीव्र प्रतिसाद मिळाला.
Ans: पाकिस्तान आणइ अफगाणिस्तानमध्ये सीमांवर एकमेकांनी केलेल्या हल्ल्यांवरुन वाद सुरु आहे.
Ans: २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे.
Ans: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तिसऱ्या बैठकीत सीमावादावर कोणताही तोडगा निघालेला नाही.