America Shutdown : शटडाऊनमुळे अमेरिकेत बिकट परिस्थिती ; SNAP योजनेवर तात्पुरती स्थगितीमुळे सामान्यांचे हाल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयाने ट्रम्प यांच्या याचिकेला मान्यता देत SNAP (Supplemental Nutrition Assistance Program) म्हणजेच अन्नधान्य सहाय्य योजनेच्या निधी वितरणाला तात्पुरती स्थिगती दिली आहे.
या योजनेअंतर्गत गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना अन्न खरेदीसाठी सरकारद्वारे निधी पुरवला जातो. लोकांना दर महिन्याला इलेक्टॉनिक कार्डवर काही पेसै मिळतात, ज्यामुळे लोकांना किराणा माल खरेदी करता येतो. या योजनेअंतर्गत सरकारला नोव्हेंबर महिन्याचे पूर्ण पैसे लोकांना द्यावे लागायचे. परंतु सरकारने सध्याची बिघडती परिस्थिती पाहता हा निर्णय स्थगित केले आहे. यामुळे सरकारला या योजनेचा काही भागाचे वितरण करायचे आहे. ट्रम्प प्रशासनाने दाखल केलेल्या याचिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकांना या SNAP योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दर महिन्याला सुमारे ३०० डॉलर्स म्हणजेच २५ हजार रुपये आणि चाप जणांच्या कुटुंबाला सुमारे १ हजार डॉलर्स म्हणजे ८० हजार रुपये दिले जातात. यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत कमी उत्पन्न असलेल्या लोकांना आणि गरीबांना अन्नधान्यांसाठी मदत मिळते.
न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे की, काही राज्यांना पूर्ण निधी देण्यात यावा, तर काही राज्यांना गरजेपूरता निधी पूरवावा. शुक्रवारी (०७ नोव्हेंबर) रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काही लोकांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कार्डवर पैस मिळाले आहे, तर काही लोक अजूनही मदतीची वाट पाहत आहेत. ओरेगॉन, हवाई आणि कॅलिफोर्निया राज्यांना पूर्ण निधी पुरवण्यात आला आहे, पण इतर राज्यांमध्ये अद्यापही कोणती मदत मिळाली नाही.
सध्या अमेरिकेचे फंडिग बिल पास न झाल्याने ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. परंतु यामुळे अनेक लोकांच्या मिळणाऱ्या मदती बद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेक लोकांकडे खाण्याचे पैसे उरलेल नाहीत. तर काहीजण कर्ज घेऊन आपले दैनंदिन खर्च भागवत आहेत. सध्या परिस्थिती अत्यंत बिघडत चालली असून ट्रम्प सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
अमेरिकेच्या सिनेटमध्ये फंडिग बिलाला मंजूरी न मिळाल्याने हे शटडाऊन सुरु आहे. आतापर्यंत ११ वेळा मतदान करण्यात आले आहे. पण सरकारला ६० पैकी केवळ ५५ मते मिळाली आहेत. यामुळे निधी मंजूर झालेला नाही.
America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम
Ans: अमेरिकेत गेल्या एक महिना ८ दिवसांपासून शटडाउन सुरु आहे.
Ans: सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे अमेरिकेतील सामान्यांना मिळणारी SNAP योजना बंद झाली आहे.
Ans: SNAP योजना म्हणजे, ज्याअंतर्गत योजनेअंतर्गत गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना अन्न खरेदीसाठी सरकारद्वारे निधी पुरवला जातो.
Ans: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने SNAP योजना तात्पुरती स्थगित केली आहे.






