Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-IranWar: ‘आम्ही इराणला धोका देणार नाही पण…’ असीम मुनीरने बोलावली ‘इमर्जन्सी’ मीटिंग; युद्धात पाकिस्तान ‘असा’ ठरणार बळीचा बकरा

Iran Crisis: अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यास परिस्थिती आणि पाकिस्तान काय करेल यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. ट्रम्प पाकिस्तानला इराणविरुद्ध आघाडी उघडण्यास सांगू शकतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 14, 2026 | 03:30 PM
pakistan army chief asim munir emergency meeting us iran war airbase controversy 2026

pakistan army chief asim munir emergency meeting us iran war airbase controversy 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानची गुप्त बैठक
  • एअरबेसचा पेच
  • अंतर्गत यादवीची भीती

Asim Munir emergency meeting Iran crisis 2026 : इराणमधील (Iran) इस्लामी राजवटीविरुद्ध सुरू असलेल्या जनआक्रोशाने आता जागतिक युद्धाचे वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी “मदत येत आहे” (Help is coming) असे संकेत दिल्याने इराणवर अमेरिकन हल्ल्याची टांगती तलवार आहे. मात्र, या संघर्षात सर्वात जास्त कोंडी झाली आहे ती पाकिस्तानची. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अलीकडेच उच्चस्तरीय सुरक्षा अधिकाऱ्यांची एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये इराणवर हल्ला झाल्यास पाकिस्तानने कोणाची बाजू घ्यावी, यावर खलबते झाली.

असीम मुनीर यांची आपत्कालीन बैठक आणि ‘प्लॅन-बी’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आयएसआय (ISI) प्रमुख आणि नवनियुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल असीम मलिक, दक्षिणी कमांडर आणि लष्करी गुप्तचर विभागाचे महासंचालक उपस्थित होते. बैठकीचा मुख्य अजेंडा हा होता की, जर अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर किंवा लष्करी तळांवर हल्ले केले, तर पाकिस्तानला आपली बाजू स्पष्ट करावी लागेल. ट्रम्प प्रशासनासोबत पाकिस्तानचे संबंध सुधारत असताना, इराणसारख्या ‘शेजारी’ देशाला शत्रू बनवणे पाकिस्तानला परवडणारे नाही.

एअरबेस आणि हवाई क्षेत्राची मागणी?

पाकिस्तानसाठी सर्वात मोठा यक्षप्रश्न म्हणजे अमेरिकेला लष्करी तळ (Airbases) देणे. शीतयुद्धाच्या काळात आणि अफगाणिस्तान युद्धावेळी पाकिस्तानने अमेरिकेला आपले तळ वापरू दिले होते. आता ट्रम्प प्रशासन इराणवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राची मागणी करू शकते. जर पाकिस्तानने ‘नाही’ म्हटले तर अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक मदत थांबू शकते आणि जर ‘हो’ म्हटले तर इराणसोबतची सीमा रक्ताने माखू शकते.

BREAKING NEWS!🚨
🟥More Details on the Meeting Between Pakistan’s Military Chief Asim Munir & the U.S.-Israeli Intelligence Delegation:
🔴Sources say that during the recent visit of the U.S. and Israeli intelligence delegation to Islamabad, Asim Munir assured them that Pakistan… pic.twitter.com/97iOJQPH1L — Afghanistan Defense (@AFGDefense) January 7, 2026

credit : social media and Twitter

अंतर्गत बंडाळी आणि शिया-सुन्नी संघर्षाची भीती

पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांची संख्या सुमारे ३० टक्के आहे, ज्यांची इराणबद्दल मोठी सहानुभाती आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत अशी भीती व्यक्त करण्यात आली की, इराणवर अमेरिकन किंवा इस्रायली हल्ला झाल्यास पाकिस्तानच्या रस्त्यांवर हिंसाचार उसळू शकतो. याव्यतिरिक्त, इराणमधून लाखो निर्वासित पाकिस्तानात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल.

बलुचिस्तान सीमेवर वाढता तणाव

पाकिस्तानची बलुचिस्तान सीमा इराणला लागून आहे. या भागात आधीच फुटीरतावादी गट सक्रिय आहेत. इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाल्यास हे गट अधिक आक्रमक होऊ शकतात. असीम मुनीर यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी इशारा दिला की, अफगाणिस्तानसोबतची ‘डुरंड लाईन’ आधीच धगधगत असताना इराणसोबत दुसरी युद्धजन्य सीमा उघडणे पाकिस्तानसाठी आत्मघाती ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने पाकिस्तानकडे एअरबेसची मागणी केली आहे का?

    Ans: अधिकृतपणे पाकिस्तानने हे वृत्त फेटाळले आहे, परंतु सुरक्षा सूत्रांनुसार, ट्रम्प प्रशासन पडद्यामागे हवाई क्षेत्र वापरण्यासाठी दबाव टाकत आहे.

  • Que: इराणवर हल्ला झाल्यास पाकिस्तानमध्ये काय परिणाम होतील?

    Ans: पाकिस्तानमधील मोठी शिया लोकसंख्या रस्त्यावर उतरू शकते, ज्यामुळे देशात अंतर्गत सुरक्षा आणि जातीय तणाव निर्माण होऊ शकतो.

  • Que: असीम मुनीर यांच्या बैठकीचा मुख्य निष्कर्ष काय?

    Ans: इराण सीमेवर सुरक्षा वाढवणे आणि अमेरिकेला थेट लष्करी मदत देण्यापूर्वी देशांतर्गत स्थिरतेचा विचार करणे, हा या बैठकीचा मुख्य हेतू होता.

Web Title: Pakistan army chief asim munir emergency meeting us iran war airbase controversy 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • America
  • Asim Munir
  • Iran Protest
  • pakistan
  • World War 3

संबंधित बातम्या

US visa cancellation: ट्रम्प सरकारचा मोठा झटका! 1 लाखांहून अधिक व्हिसा केले रद्द
1

US visa cancellation: ट्रम्प सरकारचा मोठा झटका! 1 लाखांहून अधिक व्हिसा केले रद्द

Iran Protests 2026: ‘माझ्यावर एक उपकार करा, थोडी लाज बाळगा’ जर्मनी- इराणमध्ये शब्दयुद्ध तीव्र; खामेनेई सरकारला लागला सत्तासुरुंग
2

Iran Protests 2026: ‘माझ्यावर एक उपकार करा, थोडी लाज बाळगा’ जर्मनी- इराणमध्ये शब्दयुद्ध तीव्र; खामेनेई सरकारला लागला सत्तासुरुंग

Islamic NATO: आशियात नव्या लष्करी युतीचा थरार! भारतासाठी ठरणार ‘लार्जर थ्रेट’; अण्वस्त्रे आणि आधुनिक शस्त्रांचा नवा गेमप्लॅन
3

Islamic NATO: आशियात नव्या लष्करी युतीचा थरार! भारतासाठी ठरणार ‘लार्जर थ्रेट’; अण्वस्त्रे आणि आधुनिक शस्त्रांचा नवा गेमप्लॅन

Iran Protest 2026: रस्ते रक्ताने माखले, शवागारे भरली; इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील
4

Iran Protest 2026: रस्ते रक्ताने माखले, शवागारे भरली; इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.