Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Pakistan Breaking: इमरान खान यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमुख मार्गांवर सुमारे ३,५०० कंटेनर लावण्यात आले असून, तब्बल १८,००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षाव्यवस्थेवर दररोज सुमारे ३ लाख डॉलर खर्च होत आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 28, 2026 | 09:09 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आंदोलन लांबणीवर
  • ३,५०० कंटेनरने रस्ते ब्लॉक
  • लवाजमा ,फौजफाटा
Pakistan Breaking : पाकिस्तानमध्ये जवळजवळ बॉलीवूड सिनेमा सुरु आहे . पाकिस्तानच्या सध्याच्या सरकाने इमरान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ५ ऑगस्ट २०२३ तुरुंगात ठेवले आहे . म्हणजे २८ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना तुरुंगात जाऊन ३ वर्ष ५४ दिवस झाले आहेत . सध्या ते रावळपिंडीतील अडियाला जेलमध्ये आहेत . पाकिस्तानमध्ये यामुळे दोन गट पडले आहेत .

इमरान खान आजारी असल्याचे कळल्यापासून पाकिस्तानमध्ये त्यांच्याबद्दल सहानभूती वाढत चालली आहे . यात भर म्हणून गेल्या काही काळात जगभरातील ठराविक खेळाडूंनी इमरान खान यांना व्यवस्थित उपचार आणि वागणूक मिळावी यासाठी पाकिस्तान सरकारला पत्र पाठवले होते . इमरान खान यांनी स्थापन केलेल्या पार्टीने वारंवार इमरान खान वरील आरोप फेटाळले असून त्यांच्या सुटकेसाठी आंदोलने , लॉन्ग मार्च काढले आहेत .

पण या सगळ्याचा सरकारवर काहीच फरक पडला नसून , इमरान यांना सोडण्यात आलेले नाही . याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षाने पुन्हा एकदा मोठा लॉन्ग मार्च काढणार असल्याचे जाहीर केले . आणि पाकिस्तानमध्ये वातावरण गरम व्हायला सुरवात झाली . या आगीत भर पडली ती इम्रान खान यांच्या बहिणीची ,अलीमा खान यांनी आपण मोर्च्यात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले .

यानंतर लगेच अलीमा खान यांना अटक केली . पाकिस्तानमध्ये इमरान खान यांच्या PTI या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरवात केली ,यामुळे पाकिस्तान सरकार आणि PTI यांच्यात गरमा गरमी झाली . यामुळे संभाव्य मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे .

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

आंदोलन लांबणीवर

मोठ्या प्रमाणात झालेल्या कार्यकर्त्यांच्या धरपकडीमुळे PTI ला इमरान खान यांच्या समर्थनार्थ इस्लामाबादमध्ये नियोजित आंदोलन काही काळासाठी पुढे ढकलले आहे . त्यामुळे पाकिस्तानच्या राजधानीतील राजकीय वातावरणात तणाव कायम असला तरी आंदोलनाची तीव्रता फक्त थोडीच कमी झाली आहे .

पण PTI च्या कार्यकर्त्यांनी सरकारने कितीही दबाव आणला तरी इमरान खान यांना फुकटचा बळी जाऊन देणार नाही , त्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवल्याचे सूत्रांच्या माहितीवरून समजते आहे .

३,५०० कंटेनरने रस्ते ब्लॉक

प्लास्टिकचे , लोखंडाचे छोटे बॅरेकेट्स सहज आंदोलनकर्त्यांकडून लांब फेकून दिले जातील . अश्रू धूर चा सुद्धा बंदोबस्त केला जाईल म्हणून पाकिस्तान सरकार ने मोठमोठे कार्गो कंटेनर इस्लामाबादच्या महत्वाच्या रस्त्यांवर आणून ठेवले आहेत . त्याची रचना एखाद्या भिंतीसारखी करून ठेवलेली आहे .

यासाठी सुमारे ३५०० कंटेनर तैनात केले आहेत . वाहतूक आणि आंदोलनकर्त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे . हे कंटेनर लावत असताना कार्यकर्तेही लांबून बघून अंदाज घेत आहेत . असे समजते आहे .

SpaceX Starship: ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

लवाजमा ,फौजफाटा

जणू काही पाकिस्तानमध्ये आणीबाणीची वेळ आल्यासारखे पाकिस्तान सरकार तुफान तयारीत रमले आहे . शहरात तब्बल १८ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात केले असून , या मोठ्या सुरक्षा बंदोबस्तासाठी प्रशासनाला दररोज ३ लाख डॉलरहून अधिकचा खर्च येत असल्याचे सांगितले जात आहे . पाकिस्तानात आता मोर्चा कधी निघतोय आणि धुमचक्री सुरु होतेय याकडे जगाचे लक्ष लागले आहे .

 

Web Title: Pakistan breaking massive security arrangements3500 containers 18000 police personnel and an expenditure of 300000solely for imran khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Breaking News
  • Imran khan
  • Marathi News
  • Pakistan News
  • Protest

संबंधित बातम्या

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
1

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
2

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
3

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
4

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.