Pakistan China Relations Pakistan requested for a loan of 10 billion yuan from China
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या ताणावाचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये दहशतवादाला पाकिस्तानच्या पाठिंब्यावरुन वाद सुरु झाला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई करत काही निर्णय घेतले आहे. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांविरोधात योग्य ती कारवाई करत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही. यामुळे दोन्ही देशांत मोठा वाद सुरु झाला आहे.
पाकिस्तान भारताला एकामागून एक युद्धाच्या धमक्या देत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली गरिबी दाखवून दिली आहे. पाकिस्तानने चीनकडून 1.4 अब्ज डॉलर्सचे आणखी कर्ज घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी चीनला स्वॅप लाईन 1.4 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. पांडा बॉंड्स लॉंच करण्यासाठी पाकिस्तानने हे कर्ज घेतले आहे. शनिवारी (26 एप्रिल) वॉशिंग्टनच्या आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बॅंक समूहाच्या बैठकीत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. दरम्यान पाकिस्तानने यापूर्वी देखील चीनने 30 अब्ज युआनची स्वॅप लाईन वाढवली होती.
चीनच्या मध्यवर्ती बॅंका अर्जेंटिना आणि श्रीलंकासारख्या देशांच्या उदयाला येत असलेल्या अर्थव्यवस्थांसाठी चलन स्वॅप लाईनद्वारे मदत करते. पाकिस्तानने आपला पहिला पांडा बॉंड लॉन्च करण्यासाठीही चीनकडून 1.4 अब्ज डॉलर्स घेतले आहे.तसेच पाकिस्तानचे अर्थमंत्री यांनी म्हटले आहे की, “पाकिस्तानला कर्जाच्या आधारे देशात विविधता आणायची आहे, यामध्ये आम्हाला चांगले यश देखील मिळाले आहे.”
याशिवाय त्यांनी आयएमएफ बोर्डाकडून देखील कर्जाची अपेक्षा केली आहे. पाकिस्तानने क्लायमेट रेझिलियन्स लोन प्रोग्राम अंतर्गत आयएमएफ बोर्डाकडून 1.3 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. याअंतर्गत पाकिस्तान कर्मचारी स्तरीय करारावर स्वाक्षरी करणार आहे. आएमएफ बोर्डाने देखील हे कर्ज मान्य केले आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळाली आहे. यामध्ये 1 अब्ज डॉलर्स पाकिस्तानला दिले जाणार आहे.
दरम्यान पहलगाम हल्ल्यावरुन भारतासोबतच्या तणावादरम्यान आर्थिक परिणामांबद्दल अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, या हल्ल्यामुळे भारत संतापलेला आहे. दु:खात आहे. तसेच पाकिस्तानविरोधात कारवाई करत आहेत. यामुळे भारत पाकिस्तानला मदत करणार नाही असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने काह लढाऊ विमानांची खरेदी केली होती. दरम्यान पाकिस्तान आणि चीनमधील वाढते संबंध भारतासाठी धोकादायक मानले जात आहे. गेल्या काही दिवसांतील पाकिस्तान आणि चीनमधील वाढती जवळीक पाहता चीन हा पाकिस्तानसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताविरोधात महत्वाचा खेळाडू ठरु शकतो. चीनने आपली भूमिका पाकिस्तानच्या बाजूने घेतल्यास भारताला अनेक आव्हाने आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो.