Pahalgam Terror Attack: 'पहलगाम हल्ल्यातील आरोपींना न्यायालयीन कारवाईच्या चौकटीत आणा'; संयुक्त राष्ट्रांची मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारताच्या जम्मू आणि काश्मीर येथील पहलगमामध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. पहलगमामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्टकांवर 5 ते 6 हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात दुखाचे आणि संतापाचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान जागतिक स्तरावर देखील अनेक देशांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. याच वेळी भारताने दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांची घरे उद्धवस्त करुन लावली आहेत. त्याना पकडून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने (UNSC) पहलगमामधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच या घृणास्पद दहशतवादी कृत्यातील आरोपींना न्यायलयाच्या चौकटीत आणण्याची मागणी केली आहे. समितीने म्हटले आहे की, या अमानवीय कृत्यातीतल आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या दोषींवर कडक कारवा केली पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या 15 देशांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवारी (25 एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यासंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या समितीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. निवेदनात समितीने म्हटले आहे की, “कोणत्याही प्रकराचा दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोकादायक आहे. हल्ल्याचा हेतू काहीही असो, कुठेही आणि केव्हाही आणि कोणीही हल्ला केलेला असो, तो गुन्हा आहे आणि अन्यायी आहे.” असे म्हटले आहे.
तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने पहलगामच्या दहशतवादी कृत्यासाठी हल्ला करणाऱ्या आरोपींना, तसेच हल्ल्याची योजना बनवणाऱ्या आणि त्यांना मदत पुरवणाऱ्यांना जबाबदार धरले आहे. यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी करत हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप लोकांना न्याय मिळवून देण्याची गरज अधोरेखित केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुव्यवस्थेच्या ठरावानुसार सर्व देशांना त्यांच्या पातळीवर सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हे निवेदन 15 देशांच्या वतीने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने प्रसिद्ध केला आहे.
याच दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ॲंटोनिओ गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना पत्रकरा परिषदेत भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी स्टीफन यांमनी उत्तर देताना म्हटले की, “आम्ही अत्यंत गंभीरपणे दोन्ही देशांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन आम्ही करतो असे म्हटले.