Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fatah3: चीनचा माल अन् पाकिस्तानची दलाली! ब्रह्मोसला घाबरलेल्या पाकिस्तानचा नवा ‘मिसाईल’ बनाव; आखाती देशांची होणार फसवणूक?

Pakistan Fatah Missile News: पाकिस्तानी लष्कर आता आखाती देशांना आपले चीननिर्मित फताह-३ क्षेपणास्त्र विकून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचा दावा आहे की हे भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राला टक्कर देणारे आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 11, 2026 | 03:15 PM
pakistan fatah 3 missile brahmos china gulf countries scam 2026

pakistan fatah 3 missile brahmos china gulf countries scam 2026

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा ‘मिसाईल’ बनाव
  • चीनचा छुपा अजेंडा
  • ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अपयश

Pakistan Fatah-3 Missile vs BrahMos : दक्षिण आशियातील लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत आता एक नवीन वळण आले आहे. स्वतःची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना, पाकिस्तानी लष्कर आता ‘शस्त्रास्त्रांचा दलाल’ बनून पैसे कमावण्याच्या धडपडीत आहे. भारताच्या शक्तिशाली ब्रह्मोस (Nuclear missiles) क्षेपणास्त्राने धास्तावलेल्या पाकिस्तानने आता चीनच्या मदतीने बनवलेले ‘फताह-३’ (Fatah-3) क्षेपणास्त्र जागतिक बाजारपेठेत, विशेषतः आखाती देशांना विकण्यासाठी जोरदार मार्केटिंग सुरू केले आहे. मात्र, या शस्त्रास्त्रांच्या गुणवत्तेवर आणि पाकिस्तानच्या दाव्यांवर आता जागतिक संरक्षण तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय आहे ‘फताह-३’ आणि त्यामागचे चिनी कनेक्शन?

पाकिस्तानचा दावा आहे की, फताह-३ हे पूर्णपणे स्वदेशी आणि भारताच्या ब्रह्मोसला चोख प्रत्युत्तर देणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. मात्र, ‘एशिया टाइम्स’च्या शोधनिबंधातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फताह-३ हे प्रत्यक्षात चिनी कंपनी ‘ग्वांगडोंग होंगडा’ने विकसित केलेल्या HD-1 क्षेपणास्त्राची हुबेहूब प्रतिकृती आहे. म्हणजेच, चीनने आपले तंत्रज्ञान पाकिस्तानला दिले असून, पाकिस्तान आता ते आपले असल्याचे सांगून आखाती देशांना विकत आहे. हे क्षेपणास्त्र मॅक २.५ ते ४ या वेगाने प्रवास करू शकते आणि साधारण ४५० किमी पर्यंत लक्ष्य भेदू शकते, असा दावा केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Agni MIRV Missile: भारताचा ‘दिव्यास्त्र’ प्रहार! ड्रॅगनला बसला ताकदीचा जबरदस्त धक्का; गुप्तहेर जहाज तैनातीही ठरली निष्फळ

‘ऑपरेशन सिंदूर’ अन् पाकिस्तानची उडालेली दाणादाण

पाकिस्तान ज्या क्षेपणास्त्राचा एवढा उदोउदो करत आहे, त्याचे वास्तव ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जगासमोर आले होते. भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी जेव्हा पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांना लक्ष्य केले, तेव्हा पाकिस्तानकडे त्याला रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने फताह क्षेपणास्त्रे डागली खरी, पण भारताच्या अभेद्य हवाई संरक्षण प्रणालीने (Air Defence System) ही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. ज्या शस्त्रांनी प्रत्यक्ष युद्धात काहीही कामगिरी केली नाही, ती शस्त्रे आता पाकिस्तान आखाती देशांना ‘ब्रह्मोस किलर’ म्हणून विकत आहे, हा एक मोठा आंतरराष्ट्रीय बनाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

🔴”Made in china, masked by pakistan: the fatah-3 is just the hd-1 in a costume!” 🎭🇨🇳 Pakistan unveils the Fatah-3, but the world sees the Chinese HD-1 in a green tracksuit. It’s not “indigenous” because the blueprints arrived via Beijing Express! Critics are roasting the… pic.twitter.com/1kcw1XheFQ — Resonant News🌍 (@Resonant_News) May 10, 2026

credit – social media and Twitter

आखाती देशांना कशाचे आमिष?

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा फायदा घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. सौदी अरेबिया, कतार आणि युएई यांसारख्या देशांना इराणपासून धोका असल्याचे भासवून, पाकिस्तान स्वतःला त्यांचा ‘रक्षक’ म्हणून सादर करत आहे. सौदी अरेबिया सध्या गुप्तपणे आपली क्षेपणास्त्र शक्ती वाढवत असून, त्यांनी चीनकडून यापूर्वीच DF-3 क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत. याच संधीचा फायदा घेऊन पाकिस्तान त्यांना फताह-३ आणि JF-17 लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी गळ घालत आहे. या व्यवहारातून मिळणारा पैसा पाकिस्तानला भारताच्या विरोधात स्वतःचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी वापरायचा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा आला समोर; 45 दिवसांत घेतले भारत विरोधी ‘हे’ चार निर्णय

ब्रह्मोस वि. फताह-३: तुलनाच अशक्य!

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ब्रह्मोस आणि फताह-३ ची तुलना करणे म्हणजे विमानाची तुलना पतंगाशी करण्यासारखे आहे. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते, ज्याचा पल्ला आणि मारक क्षमता फताहपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पाकिस्तान केवळ वजनाने हलके आणि स्वस्त असल्याचे सांगून या चिनी बनावटीच्या मालाची दलाली करत आहे. मात्र, प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव आणि तांत्रिक विश्वासार्हता या बाबतीत पाकिस्तानचे क्षेपणास्त्र कुठेही टिकत नाही.

Web Title: Pakistan fatah 3 missile brahmos china gulf countries scam 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • China
  • Middle East War Impact
  • Nuclear missiles
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
1

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
2

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
3

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल
4

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.