
Imran’s sisters and PTI's protest outside Adiala jail
इम्रान खानच्या बहिणी आपल्या भावाला भेटण्यासाठी रावपिंडीतील अदियाला तुरुंगात गेल्या होत्या. परंतु शाहबाज सरकारने त्यांना भेटून दिले नाही. यामुळे इम्रान खानच्या बहिणी अलिमा खान, उज्मा खान आणि नौरीन नियाझी यांनी तुरुंगाबाहेरच उशिरा रात्री आंदोलन सुरु केले आहे. तसेच शाहबाज सरकारला जोपर्यंत इम्रान खानला भेटू दिले जात तोपर्यंत निषेध सुरुच राहिल असा अल्टीमेटमही दिली आहे.
यामुळे अदियाला तुरुंगाबाहेर मोठा गोंधळ उडाला आहे. इम्रान खान यांची बहिणी नूरीन खान यांनी म्हटले की, पाकिस्तान सरकारने आम्हा पाच मिनिटाच जरी भेटण्यासाठी वेळ दिला असता तर हा गोंधळ घडला नसताच, आम्ही शांततेत निघून गेलो असतो. सध्या आमच्या भावासोबत नेमकं काय घडलं आहे, तुरुंगात काय परिस्थिती आहे हे आम्हाला माहित नाही.
तर इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने देखील आरोप केला की, न्यायालयाच्या आदेशानंतरही शाहबाज शरीफ आणि पंजाबचे मरियम नवाज सरकार तुरुंगात कैद असलेल्या इम्रान खान यांना भेटण्यास त्यांच्या बहिणींना नकार देत आहे. गेल्या आठवड्यात अदियाला तुरुंगाच्या पोलिसांनी खान यांच्या बहिणींना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप देखील पीटीआय पक्षाने केला आहे. सध्या रावळपिंडीत अदियाला तुरुंगाबाहेरील परिस्थिती बिघडत चालली आहे. आंदोलनेकर्ते इम्रान खानच्या समर्थनार्थ आणि शाहबाज सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आहेत.
२०२३ मध्ये पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात देशव्यापी निदर्शने झाली होती. या आंदोलनाने हिंसक रुप धार केले होते. यावेळी सरकार व लष्करावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला होता. इम्रान खान यांच्यावर अनेक प्रकरणांचे आरोप आहेत. तसेच त्यांची पत्नीी बुशरा बीबीवरही गैर-इस्लामिक विवाहाचा आरोप, सायफर गेट घोटाळा, आणि तोशाखाना प्रकरणे इम्रान खान यांची साथ दिल्याचा आरोप आहे.
आता Imran Khan ची बहीण अलिमा खानचीही पाकिस्तानला अडचण, दिले अटकेचे आदेश
Ans: पाकिस्तानच्या रावळपिंडीत अदियाला तुरुंगाबाहेर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणींनी निषेध सुरु केला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
Ans: इम्रान खानच्या बहिणी आपल्या भावाला भेटण्यासाठी रावपिंडीतील अदियाला तुरुंगात गेल्या होत्या. परंतु शाहबाज सरकारने त्यांना भेटून दिले नाही. यामुळे खान यांच्या बहिणींनी तुरुंगाबाहेर आंदोलन सुरु केले आहे.
Ans: इम्रान खानच्या बहिणींनी जोपर्यंत त्यांना त्यांच्या भावाला भेटून दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असा अल्टीमेटम दिला आहे.
Ans: शाहबाज सरकार न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांच्या बहिणींना किंवा इतरांना त्यांना भेटू देण्याची परवानगी देत नसल्याचा आरोप केला आहे.