Pakistan News Protest in Pakistan in Demand of Former PM Release
Pakistan News marathi : इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) मोठा गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI)कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सध्या गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यांच्या सुटकेसाठी शांततपूर्ण आंदोलानेच आयोजन पीटीआयने केले आहे. मंगळवारी (५ ऑगस्ट) पाकिस्तानमध्ये शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र यामुळे पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा गोंळध उडाला आहे.
या आंदोलनांमध्ये शांततपूर्ण इम्रान खान (Imran khan) यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये हे आंदोलन सुरु आहे. लाहोरमधील आंदोलनातून ५०० हून अधिक पीटीआय कार्यकर्त्यांना अटक करम्यात आली आहे. पीटीआयने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तसेच पीटीआयने इम्रान खानने आपल्या समर्थकांना देशात लोकशाहीसाठी शांताता आंदोलन करण्याचे आवाहान केले आहे.
पाकिस्तानच्या पीटीआय पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरु केला आहे. यामध्ये सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि पंजाबच्या प्रदेशात शांततापूर्ण आंदोलने सुरु आहेत. तसेच इम्रान खान यांची बहिण अलिमा खान यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रीय असेंब्लीचे सदस्य आणि सिनेटर आदियाला इम्रान खान यांच्या तुरुंगाबाहेर जमणार आहे.
यामुळे पाकिस्तानच्या सरकारने पीटीआयच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाभोवती सुरक्षा वाढवली आहे. अतिरिक्त सैन्य दल तैनात करण्यात आले आहेत. तसेच बेकायदेशीर मेळावा आणि मोठ्या संख्येने लोकांचा जमावावर बंदी घातली आहे.
पाकिस्तान-इराण आले एकत्र; नव्या रेल्वे मार्गेने जोडले जाणार दोन देश, भारताचं टेन्शन वाढणार?
Punjab Police arrest PTI activists in crackdown on Free Imran Khan protests across the province. #PakistanPolitics #PTIProtest
— Swing Trader 📊 (@MAdnanSattar) August 5, 2025
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले होते. परंतु इम्रान खानने सर्व आरोप फेटाळले असून ही एक राजकीय खेळी असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान विरोधात दहशतवाद आणि गुप्त कागदपत्रे उघड करण्यापर्यंत आरोप ठोठवण्यात आले आहेत. २०२३ मध्ये इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये देशव्यापी आंदोलन झाले होते.
Russia Ukraine War : युक्रेन युद्ध थांबण्यासाठी आज होणार चर्चा? रशिया आणि अमेरिका येणार आमने-सामने