Russia Ukraine War : युक्रेन युद्ध थांबण्यासाठी आज होणार चर्चा? रशिया आणि अमेरिका येणार आमने-सामने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia US talk on Ukraine War : वॉशिंग्टन : गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. गेल्या अनेक काळापासून युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु आहे, या चर्चा अपयशी ठरल्या आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या यावर युद्धबंदीसाठी प्रयत्न करत आहेत. आज ट्रम्प रशियाशी चर्चा करणार आहे. नुकतेच त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीशी मंगळवारी (०५ ऑगस्ट) अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
दोन्ही नेत्यांनी युद्धबंदी करार, रशियावरील निर्बंध आणि अमेरिका-युक्रेनमधील ड्रोन करार पूर्ण करण्यावर चर्चा केली. आज ही चर्चा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी होणार आहे. ट्रम्प यांनी रशियाला युद्धबंदीच्या चर्चेसाठी ८ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे. यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत, परंतु अद्याप पुतिन यांनी शांतता चर्चेसाठी कोणचाही रस दाखवलेला नाही. सध्या ट्रम्प रशियावर चर्चेसाठी दबाव आणण्यासाठी त्यांच्या मित्र राष्ट्रांना कर लादण्याची धमकीही देत आहेत. परंतु रशियाने याला तीव्र विरोध केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीय औषध उत्पादनांवर वक्रदृष्टी, २५० टक्के टॅरिफ लावणार?
दरम्यान ट्रम्प यांनी रशियाला ८ शांतता चर्चेसाठी ८ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे. जर ८ ऑगस्टपर्यंत युद्धबंदीवर चर्चा झाली नाही आणि कोणताही तोडगा निघाला नाही, तर ट्रम्प यांनी रशियावर नवीन कडक निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह वीटकॉफ बुधवारी(०६ ऑगस्ट) मॉस्कोला जाणार आहेत. येथे रशियन नेतृत्त्वासोबत ते युद्धबंदीवर चर्चा करतील.
याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky)यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चे संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेली चर्चा यशस्वी ठरली आहे. आम्ही तात्काळ युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देतो. तसेच रशियालाही शांतात चर्चेची ऑफ झेलेन्स्कींनी दिली आहे. विशेष करुन त्यांनी युक्रेनच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहान केले आहे. परंतु रशिया अद्यापही हल्ले करत असल्याचेही झेलेन्स्कींनी म्हटले आहे.
The Russians are now trying to make their attacks more intense. We in Ukraine fully support the American proposal for an immediate ceasefire. We’ve already tried many different formats – ways to stop the fighting, to stop the killing. We have spoken and offered Russia silence in… pic.twitter.com/MQp05MlpOF — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) August 5, 2025
झेलेन्स्की यांनी सांगितदले की, युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागातील परिस्थितीतची डोनाल्ड ट्रम्प यांना जाणीव आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, ट्रम्प यांनी रशियाला ८ ऑगस्टपर्यंत युद्धबंदीचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी यासाठी अनेक योजना देखील आखल्या आहेत.
सध्या अमेरिकेने रशियाला युद्धबंदीसाठी अल्टीमेटम दिला असून यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. यानंतर ट्रम्प रशियावरील निर्बंध अधिक कडक करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही १००% कर लागू करण्याची धमकी दिली आहे. विशेष करुन यामध्ये भारताला लक्ष्य केले जात आहे. परंतु आतापर्यंत पुतिन यांनी चर्चेसाठी कोणतीही पुढाकार घेतलेला नाही. यामुळे तज्ज्ञांच्या मते, पुतिन ट्रम्प पुढे झुकणार नाहीत.
Donald Trump Tarrif Threat : भारतावर पुन्हा एकदा कर वाढवणार ट्रम्प? २५% पेक्षा जास्त दराची धमकी