Pakistan PM Shehbaz Sharif In Iran
तेहरान: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या विदेश देशांच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्यांनी तुर्कीला भेट दिली आहे. तुर्कीच्या भेटीनंतर शाहबाज इराण दौऱ्यावर आहेत. या दरम्याम शाहबाज यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि सर्वोच्च नेते अली-खामने यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यानी इराण आणि पाकिस्तानमध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
भारता आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान इराणने दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्याची महत्वाची भूमिका बजावली होती. याबद्दल शाहबाज यांनी इराणचे आभार मानले. इराणचे भारताशी ऐतिहासिकदृष्ट्या चांगले संबंध आहे. परंतु पाकिस्तान आता इराणला आपल्या बाजूने करण्याच्या प्रयत्नात आहे.
याच पार्श्वभूमीवर शाहबाज यांनी पॅलेस्टाईन मुद्द्याचा वापर करुन इराणच्या सर्वोच्च नेते अली-खामेनई यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. शाहबाज यांनी पॅलेस्टाईनींच्या समर्थनार्थ इस्लामिक देशांच्या एकत्रिकरणाचे आवाहन केले. तसेच त्यांनी इराण आणि पाकिस्तानमधील संबंध मजबूत करण्यावरही भर दिला.
Honoured to call on His Eminence Ayatollah Sayyed Ali Khamenei, Supreme Leader of Iran. I sought his views especially with regards to the current challenges faced by Muslim Ummah. We also exchanged views on bilateral and regional issues of mutual interests. I thanked him for… pic.twitter.com/smmUBJER89
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) May 26, 2025
दरम्यान पाकिस्तान अल-खामेनेई यांनी इस्लामिक जगात पाकिस्तानचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच गाझात इस्रायलींकडून होणाऱ्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी एकत्र येऊन कारवाई करण्यावर भर दिला. त्यांनी जगातील युद्धखोरांचे कलह आणि युद्ध निर्माण करण्याचे उद्दिष्टांना तोंड देण्यासाठी इस्लामिक देशांनी एकतेच्या संबंधांना चालना देणे आवश्यक असल्यचे म्हटले.
शाहबाज यांनी देखील अल-खामेनेई यांच्या विधानावर सहमती दर्शवली. त्यांनी म्हटले की, पॅलेस्टिनींच्या सुरक्षेचा प्रश्न हा जगातील सर्व मुस्लिम समुदायासाठी मोठा आहे. गाझातीव इस्रायलच्या कारवाईवरही त्यांनी खेद व्यक्त केला. शाहबाज यांनी इराणच्या सर्वोच्च नेते अल-खामेनेई यांच्या विधानावर पूर्णपण सहमती दर्शवत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि अल-खामेनेई यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविरामाचे स्वागत केले. इराणचे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी संबंध चांगले आहे.
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान तुर्की, इराण, अझरबैजान, आणि ताझिकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तुर्की आणि इराणला भेट दिली आहे. तुर्कीचा इराणला सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. तर दुसरीकडे इराणशी जवळीक साधण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरु आहे. इराणचे भारताशी संबंध मजबूत आहेत, परंतु पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतासाठी व्यापाराच्या दृष्टीकोनातून धोकादायक म्हटला जात आहे.