Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Oil Politics : सध्या व्हेनेझुएलाच्या तेलावर जागतिक स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. अमेरिकेने अध्यक्ष मादुरो अटक केल्यानंतर व्हेनेझुएलाच्या तेलाच्या अर्ध्या साठ्यावर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2026 | 11:23 PM
Why Are Venezuela’s Oil Reserves So Important

Why Are Venezuela’s Oil Reserves So Important

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलाचे तेल जगात सगळ्यात जास्त खास
  • रशिया, अमेरिका, चीन, इराण सारख्या महासत्ता देशांमध्ये तेलासाठी स्पर्धा
  • काय आहे नेमकं कारण?
  • जाणून घ्या किती आहेत तेलाचे दर
Venezuela Oil Reserves : सध्या व्हेनेझुएलाचे (Venezuela) अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Muduro) अमेरिकेच्या ताब्यात आहेत. त्यांच्या अटकेने जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर व्हेनेझुएलातील कच्च्या तेलाच्या साठ्यांबाबातही जोरदार चर्चा सुरु आहे. जागतिक राजकारणात अमेरिका, रशिया, चीन, इराण यांसारख्या महाशक्ती देशांमध्ये यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतासाठी देखील व्हेनेझुएलाचे तेल अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की व्हेनेझुएलाच्या तेलासाठी या जागतिक महाशक्तींमध्ये स्पर्धा का सुरु आहे. येथील तेलाचा जागतिक बाजारपेठांवर काय परिणाम होतो आणि याच्या किंमती काय आहे. हे आज आपण यातून जाणून घेणार आहोत.

‘ते अमेरिकेला घाबरतात…’ ; रशियन टँकर जप्त करताच ट्रम्पचे Putin-Jinping ला खुलं आव्हान

जगातील सर्वात मोठा कच्चा तेलाचा साठा व्हेनेझुएलाकडे

तर जगातील सर्वात मोठा कच्चा तेलाचा साठा हा व्हेनेझुएलाकडे आहे. व्हेनेझुएलाच्या ओरिनोको बेल्ट मध्ये सर्वाधिक साठे आढळतात. यानंतर सौदी अरेबिया, रशिया, इराण या देशांचा समावेश होतो. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अडमिनिस्ट्रेशननुसार (EIA), व्हेनेझुएलाकडे ३०३ अब्ज बॅरल कच्चा तेलाचा साठा आहे, जो जगातील एकूण साठ्याचा सुमारे पाचवा भाग आहे. ओरिनोको बेल्ट भागात सुमारे ५५,००० चौरस किमी क्षेत्राता हा साठा पसरलेला आहे. व्हेनेझुएलातील पेट्रोची किंमत ही ३.१५ रुपये असून, या किमतीत ३ लिटर पेट्रोल मिळते.

का आहे व्हेनेझुएलाचे तेल इतके खास? 

व्हेनेझुएलाचे तेल हे केवळ एक द्रव नसून ते पेट्रोल डिझेल तयार करण्यासाठी वापरता येते. व्हेनेझुएलाचे कच्चे तेल हे जास्त सल्फर असल्याने जाड आणि गाढं असते. यामुळे याच्या शुद्धीकरणासाठी हेवी रिफाइनरीजची गरज भासते. याची प्रक्रिया अधिक महाग आणि गुंतागुंतीची असते. म्हणूनच देशातील प्रत्येक रिफायनरीच सर्व प्रकारचे तेल शुद्धीकरण करु शकत नाही.

अमेरिकेसाठी हे ते का आहे खास ?

जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी या अमेरिकेच्या गल्फ कोस्टमध्ये आहेत. या रिफायनरी खास करुन व्हेनेझुएलातील जाड कच्च्या तेलावर प्रक्रियेसाठी तयार करण्यात आल्या आहेत. यातील ७० टक्के रिफायनरीज या कच्चा तेलाच्या शुद्धीकरणासाठी अनुकूल आहेत. शिवाय अमेरिकेकडे असलेले शेल बूम हे हलके क्रूड ऑइल आहे, जे प्रत्येक रिफायनरीसाठी अनुकूल नाही. यामुळे अमेरिकेकडे आधीच जगातील सर्वात मोठ्या तेलाचा साठा असतानाही व्हेनेझुएलाचे तेल अधिक महत्त्वाचे आहे.

परंतु व्हेनेझुएलाचे तेल अधिक जवळ असल्याने याचा युद्ध किंवा सागरी तणावाच्या परिस्थिती महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. यासाठी अत्यंत कमी वेळ आणि कमी खर्च अमेरिकेला लागेल. यामुळे अमेरिकेच्या पायाभूत उर्जा सुविधांनी देखील मोठी मदत होईल. ज्यामुळे अमेरिकेचा जागतिक स्तरावर तेल बाजारात मोठा प्रभाव वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. यामुळेच जगातील अनेक महासत्ता देश देखील व्हेनेझुएलातील तेलावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोणता देश किती तेल खरेदी करतो?

व्हेनेझुएलाकडून भारत, चीन, रशिया, सिंगापूर, व्हिएनाम, आणि क्युबा हे देश तेल खरेदी करतात. यामध्ये भारताने २०२४ मध्ये सुमारे २.५४ लाख बॅरल तेल खरेदी केले होते. जे जवळपास एकूण निर्यातीच्या अर्धे आहे. चीन निर्यातीच्या सुमारे ५५ ते ८०% तेल व्हेनेझुएलातून आयात करतो म्हणजे रोज ७,४६,००० बॅरल.

अमेरिकेच्या कारवाईचा जागतिक स्तरावर काय होणार परिणाम? 

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर कठो निर्भंध लादले आहेत. ज्यामुळे जागतिक तेल बाजारपेठांमद्ये डिझेल, इंधनांच्या उत्पादनांवर, त्याच्या किंमतीवर फटका बसू शकतो. विशेष करुन शुद्धीकरणाच्या पायाभूत सुविधांवर याचा परिणाम होईल. कच्चा तेलाचा पुरवाठ देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर तेल व्यापारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

व्हेनेझुएलाच्या समुद्रात अमेरिकेची मोठी कारवाई! रशियन जहाज जप्त केल्याने पुतिन संतप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हेनेझुएलाचे कच्चे तेल जगात सगळ्यात महत्त्वाचे का मानले जाते?

    Ans: व्हेनेझुएलाचे तेल हे हेवी आणि एक्स्ट्रा हेवी प्रकारत मोडते. हे ते API ग्रॅविटी जास्त असल्यामुळे जास्त गाढे असते. याचे शुद्धीकरण करण्यासाठी महागडी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया करावी लागते.

  • Que: व्हेनेझुएलात कच्चा तेलाचे सर्वात जास्त साठ कुठे आहेत?

    Ans: व्हेनेझुएलात ओरिनोको बेल्ट हा जगातील सर्वात जास्त कच्च्या तेलाचा साठा असणारे क्षेत्र आहे.

  • Que: अमेरिका सर्वात मोठा तेल उत्पादक असताना व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा का घेत आहे?

    Ans: अमेरिकेतील तेल रिफाइनरीज मशीन या हेवी तेल प्रोसेस करण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेला केवळ तेलाचेच नव्हे, पेट्रोल, डिझेल, ग्रीसही बनवता येईल. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार, ज्यामुळे अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Que: व्हेनेझुएलाच्या तेलाचा जागतिक बाजारावर काय परिणाम होतो?

    Ans: व्हेनेझुएलाच्या तेलामुळे जागतिक बाजारात तेल क्षेत्रात संतुलन निर्माण होते. मात्र येथून तेलाचा पुरवठा कमी पडल्यास हेवी कच्चाय तेलाचे प्रमाण कमी होते, परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये जागतिक स्तरावर वाढ होते.

  • Que: अमेरिकेच्या व्हेनेझुएलाच्या तेलावरील निर्बंधाचा काय परिणाम होतो?

    Ans: यामुळे तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि निर्यातेवर मर्यादा येते. तसेच तेलाच्या उत्पादन क्षमतेलाही कच्च्या तेलाची निर्यात घटल्याने फटका बसतो.

Web Title: Why are venezuelas oil reserves so important the reason global superpowers are closely watching them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • crude oil
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
1

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
2

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
3

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO
4

अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.