
Pakistan Sends Expired Aid to Sri Lanka
श्रीलंकेत Cyclone Ditwah मुळे मृत्यूचा तांडव ; भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु
पाकिस्ताने (Pakistan) श्रीलंकेला पाठवलेल्या मदतीतीलचे साहित्य एक्सपायर्ड झालेले आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने सोशल मिडिया या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असेलेल्या फोटोंवरुन हा वाद उडाला आहे. या फोटोमध्ये अन्न साहित्यावरील एक्सपायरी डेट गेल्या वर्षीची असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने ऑक्टोबर २०२४ मध्ये मुदत संपलेल्या पाण्याच्या बाटल्या, दूध आणि बिस्किटे पाठवली आहे. यामुळे पाकिस्तानवर तीव्र टीका केल्या जात आहे.
सोशल मीडियावर पाकिस्तानवर टीका
पाकिस्तानच्या या कृतीमुळे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानने केवळ मुदत संपलेले अन्न नव्हे, तर निरुपयोगी साहित्य देखील पाठवले आहे. अनेकांनी पाकिस्तानवर नीच मानसिकता अशी उपाहात्मक टिप्पणी केली आहे. पाकिस्तानकडून असे कृत्य घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्ये तुर्कीत मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी देखील पाकिस्तानने कराची पूरात मिळालेले मदत साहित्य परत केले होते. तेव्हा देखील पाकिस्तानला तीव्र टीकांचा सामना करावा लागला होता.
दरम्यान पाकिस्तानकडून मिळालेल्या या निरुपयोगी मदतीवर श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सरकारे तक्रार नोदंवली होती. यानंतर श्रीलंकेने औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पद्धतीने पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केली आहे. सध्या परिस्थिती अत्यंत वादग्रस्त बनली आहे.
पाकिस्तानचा भारताल ओढण्याचा प्रयत्न
दरम्यान पाकिस्तानने या वादा भारताला ओढण्याचा प्रयत्न करत गंभीर आरोप केले आहेत. भारताने त्यांना आपल्या हवाई मार्गे श्रीलंकेला मदत पाठवण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप केला आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देत भारताने हे आरोप खोटे आणि बनावटी असल्याचे म्हटले आहे.
Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार
Ans: पाकिस्ताने श्रीलंकेला पाठवलेल्या मदत साहित्यात अन्न-धान्यचा पुरठ्याची मुदत संपलेली आहे आणि इतर साहित्य देखील निरुपयोगी आहे.
Ans: पाकिस्ताने श्रीलंकेला पाठवलेल्या मदत साहित्यात निरुपयोगी आहे. यामुळे श्रीलंकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे.