श्रीलंकेत Cyclone Ditwah मुळे मृत्यूचा तांडव ; भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार
श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबरपासून दित्वाह आणि खराब हवामानामुळे प्रचंड विध्वंस घडला आहे. पूर आणि भूस्खलनात ३३४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३७० लोक अद्यापही बेपत्ता आहे. अहवालानुसार, ३०९,६०७ कुटुंबातील १,१८,९२९ लोक यामुळे प्रभावित झाले आहेत.
सध्या NDRF च्या पथकांचे कोलंबोच्या कोच्चिकाडे येथे बचाव कार्य सुरु केले आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासेन दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून भारतीय जवना लोकांच्या बचावाचे कार्य करत आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत आणि तात्काळ सुरक्षितता देण्याचे कार्य सुरु आहे. भारताने नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत ऑपरेशन सागर बंधू राबवत ८० NDRF कर्मंचारी आणि दोन बचाव पथके पाठवली आहे. याशिवाय भारताने १५ टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये राहण्यासाठी तंबू, स्वच्छाता किट, पाणी सुद्धीकरण गोळ्या, ब्लॅंकेट्स, सौर दिवे यांसारखे मदत पोहोचवली आहे.
भारताच्या हवाई दला्चाय हेलिकॉप्टरने या ऑपरेशन दरम्याम भारत, जर्मनी, स्लोव्हेनिया, यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांसह अडकलेल्या लोकांना प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर काढले आहे. तसेच भारताने भारतीय, इतर परदेशी नागरिक आणि श्रीलंकन नागरिकांसह २४ जणांना कोलंबोतून रुग्णालयता दाखल केले आहे. या सर्वांना गंभीर जखमी अवस्थेतच वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या पाच पथके भूस्खलनग्रस्त भागात बचावाचे कार्य करपत आहेत.
दरम्यान याच वेळी कोलंबो विमानतळावर अडलेल्या ३२० हून अधिक भारतीय प्रवाशांना परत मायदेशी देखील पाठवण्यात आले आहे. रविवारी या सर्वांना भारतात सुरक्षितपणे परत आणण्यात आले. यातील २४७ प्रवासी तिरुवनंतपुरमचे, तर ७६ प्रवासी हे दिल्लीचे होते. भारताच्या दोन हवाई दलाच्या विमानांनी या सर्वांना परत आणले असल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयाने दिली आहे.
भारतीय हवामान खात्याने, दित्वाह वादळ परिणाम भारताच्या उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकत असल्याचे म्हटले आहे. IMD ने तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्याच आला आहे. चक्रीवादळ रविवारी (३० नोव्हेंबर) पर्यंत उत्तर तामिळनाडूचट्या किनाऱ्यावर पोहोले आहे. वारे १०० किलोमीटर ताशी असण्याची शक्यता आहे.
Cyclone Ditwah : श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळाचा हाहा:कार ; १०० हून अधिकांचा मृत्यू, भारतालाही धोका






