Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानची गुप्त कारवाई! कराचीत पोलिसांशी चकमकीत ६ दरोडेखोर ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त

Pakistan Crime News : पाकिस्तानच्या कराचीत पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत दरोडेखोरांच्या टोळीचा खात्मा झाला आहे. तसेच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 24, 2026 | 09:42 AM
Pakistan

Pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • कराचीत पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकामक
  • चकामकीत ६ दरोडेखोर ठार
  • मोठा शस्त्रसाठा जप्त
Pakistan Karachi News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतून एक मोठी घटना समोर आली आहे. कराची येथे पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये मोठी चकमक झाली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) झालेल्या या चकमकीत ६ दरोडेखोर ठार झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी देखील जप्त करण्यात आला आहे. याच वेळी पंजाबच्या सिंध प्रांतात एक भीषण अपघात घडला आहे.

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता

गुप्त कारवाईत सहा दरोडेखोर ठार

कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गुप्त सुत्रांकडून पाक कॉलीनच्या एका इमारतीत दरडोखोरांची टोळून लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारो पोलिसांनी पाक कॉलीनतील दरोडेखोर असलेल्या इमारतीला चारी बाजूंनी घेरले आणि छापेमारी सुरु केली. परंतु दरोडेखोरांनी पोलिसांपासून बचावासाठी त्यांच्यावर गोळीबार केला. याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. या चकमकीत टोळीतील सहा सदस्य जागीच ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर काही दरोडेखोर पळून गेले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मोठा शस्त्रसाठा जप्त

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीवरील छाप्यात पोलिसांनी सहा पिस्तूल, एक रायफल, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही टोळी सिंध प्रांतत वेगवेगळ्या भागांमध्ये दरोडे, हत्या यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहे. या टोळीवर कारवाईपूर्वी सहा दिवस आधीच तीन भावांची या टोळीकडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली होती. सध्या फरार दरोडेखोरांची शोध सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पंजाब प्रांतात भीषण ट्रक अपघात

दरम्यान याच वेळी पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या पंजबा प्रांतात सरगोधा येथे एक भीषण अपघात घडला आहे. एक ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्याने पलटी झाला आहे. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. ट्रकचा वेग जास्त असल्याने आणि खराब रस्त्यांमुळे हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनांमुळे पाकिस्तानच्या कायदा-सुव्यवस्था आणि रस्ता सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनांच्या काही दिवसांपूर्वी कराचीतील प्रसिद्ध मॉल गुल प्लाझाला भीषण आग लागली होती. या आगीत २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण कराची हादरले होते.

पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानच्या कराचीत पोलिस चकमक कुठे झाली?

    Ans: काराची येथील पाक कॉलनीत पोलिस आणि दरोडेखोरांची चकमक झाली आहे.

  • Que: काराची पोलिसांच्या कारवाईत किती दरोडेखोर ठार झाले?

    Ans: काराची पोलिसांच्या कारवाईत 6 दरोडेखोर ठार झाले.

  • Que: पोलिसांनी दरोडेखांरांवरील कारवाईनंतर काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी सहा पिस्तूल, एक रायफल, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन गाड्या जप्त केल्या आहेत.

  • Que: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नेमका कुठे झाला अपघात?

    Ans: पाकिस्तानच्या पंजबा प्रांतात सरगोधा येथे एक भीषण अपघात घडला आहे. एक ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्याने पलटी झाला आहे.

  • Que: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अपघातात किती ठार झाले?

    Ans: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Pakistan six robbers killed in shootout in karachi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार
1

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

खळबळजनक! वॉशिंग्टनमध्ये भर चौकात Trump-Epstein चा ‘टायटॅनिक’ स्टाईल पुतळा; अमेरिकेत नवा वाद पेटला
2

खळबळजनक! वॉशिंग्टनमध्ये भर चौकात Trump-Epstein चा ‘टायटॅनिक’ स्टाईल पुतळा; अमेरिकेत नवा वाद पेटला

Israel Iran War : इराणचा डमी वॉरफेअर प्लॅन! एका पेंटिंगने इस्रायल-अमेरिकेला फसवलं? २५ कोटींच्या मिसाइलचा झाला ‘कचरा’
3

Israel Iran War : इराणचा डमी वॉरफेअर प्लॅन! एका पेंटिंगने इस्रायल-अमेरिकेला फसवलं? २५ कोटींच्या मिसाइलचा झाला ‘कचरा’

US Iran युद्धात रशियाची एन्ट्री! पुतिन यांचा इराणला गंभीर इशारा; ट्रम्प यांच्याशीही चर्चा, युद्ध थांबणार की भडकणार?
4

US Iran युद्धात रशियाची एन्ट्री! पुतिन यांचा इराणला गंभीर इशारा; ट्रम्प यांच्याशीही चर्चा, युद्ध थांबणार की भडकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.