पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, कराचीच्या सर्वात प्रसिद्ध मॉल गुल प्लाझामध्ये भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण होती या आगीत अनेकांची दुकाने जळाली आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच डझनभर लोक जखमी झाले असून त्यांनी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी (१७ जानेवारी) रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी अनेकजण दुकाने बंद करुन घरी जाणाच्या तयारीत होती. याच वेळी ही आग लागली. परंतु बहुतेक दुकाने बंद झाल्याने मॉलमध्ये लोकांची संख्या कमी होती. यामुळे कोणत्याही प्रकारची मोठी जीवितहानी झाली आहे. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसाप, मॉलच्या कपडे आणि प्लास्टिकच्या घरगुती वस्तूंचा साठी असललेल्या एका खोलीत लागली होती. या ठिकाणी काही ज्वलशील पदार्थ देखील होते. यामुळे ही आग प्रचंड वाढली.आगीने संपूर्ण मॉलला विळख्यात ओढले होते. सध्या या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. यानंतप तपास सुरु केला जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये संपूर्ण शॉपिंग मॉलला आगीने वेढले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसत आहे. रात्रीच्या आकाशात लाल आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर स्पष्ट दिसून येते आहे. या घटनेने संपूर्ण कराची हादरले आहे. कराचीमध्ये अशा घटना काही नवीन नाहीत. यापूर्वी देखील आगीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. २०२३ मध्ये अशीच एक भयंकर घटना घडली होती. ज्यामध्ये शॉपिंग मॉलच्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला होता.
🚨Karachi’s Gul Plaza mall on fire -Killing 3 and injuring 12-16 -All hospitals full 🇵🇰 pic.twitter.com/EFt2pvJlzZ — Kreately.in (@KreatelyMedia) January 17, 2026
पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक
Ans: पाकिस्तानच्या कराची येथे प्रसिद्ध मॉलला भीषण आग लागली आहे.
Ans: कराचीमधील प्रसिद्ध मॉल गुल प्लाझाला भीषण आग लागली आहे.
Ans: कराची येथे मॉलमध्ये लागलेल्या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.






