पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार 40 J-35 लढाऊ विमाने; काय आहे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची नेमकी योजना?
इस्लामाबाद: एक मोठी बातमी मिळाली आहे. पाकिस्तानने चीनकडून 40 अत्याधुनिक J-35 स्टील्थ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनचे हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान पहिल्यांदाच कोणत्याही परदेशी भागीदाराला निर्यात होणार आहे. पाकिस्तान वायुसेनेने (PAF) या विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली असून, दोन वर्षांत विमानांचे वितरण होण्याची शक्यता आहे.
हे विमान पाकिस्तानच्या सध्या वापरात असलेल्या जुन्या F-16 आणि फ्रेंच मिराज विमानांचा पर्याय म्हणून काम करणार आहेत. या कराराबाबत बीजिंगकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच, चीनच्या सरकारी माध्यमांनीही या संदर्भात कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.
J-35 लढाऊ विमान विकसित करणाका एकमेव देश
J-35 लढाऊ विमान मुख्यतः चीनच्या विमानवाहू पोतनसाठी तयार करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झुहाई येथे झालेल्या वार्षिक एअर शोमध्ये हे विमान प्रदर्शित करण्यात आले होते. या शोमध्ये पाकिस्तान वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, चीन हा स्टील्थ विमान विकसित करणारा या भागातील एकमेव देश आहे. पाकिस्तान वायुसेनेचे प्रमुख एअर मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू यांनी यावर्षी जानेवारीत सांगितले होते की, J-31 स्टील्थ विमान खरेदीसाठी पायाभूत कामगिरी पूर्ण झाली आहे. त्यामुळे J-35 विमानांच्या खरेदीचा निर्णय याचाच पुढचा टप्पा मानला जात आहे.
पाकिस्तान चीन संबंध अधिक दृढ
चीन आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून संबंध चांगले आहेत. पाकिस्तानच्या तिन्ही सैन्यदलांच्या आधुनिकीकरणासाठी चीन मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहे. यापूर्वी चीनने पाकिस्तानला JF-17 थंडर लढाऊ विमान संयुक्तरित्या विकसित करण्यास मदत केली होती. पाकिस्तानला या विमानांद्वारे त्याच्या हवाई दलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ करण्याची अपेक्षा आहे. परंतु, देशातील आर्थिक संकट आणि सीमित संसाधनांच्या पार्श्वभूमीवर ही खरेदी किती यशस्वी ठरेल, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या निर्णयामुळे दक्षिण आशियातील सामरिक समतोलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
चीनकडून पाणबुडी देखील खरेदी करणार
या लढाऊ विमानशिवाय पाकिस्तान चीनकडून पाणबुडी देखील खरेदी करणार आहे. पाकिस्तान आपल्या नौदलाला मजबूत करण्याच्या दिशेने झपाटच्याने पावले उचलत आहे. विशेष करुन पाकिस्तानने आण्विक पाणबुडीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पाकिस्तानचे माजी नौदल अधिकारी रिटायर्ड कमांडर ओबैदुल्लाह यांनी दावा केला आहे की, पाकिस्तान 2028 पर्यंत परमाणु पाणबुडी असलेल्या देशांमध्ये सामील होईल.