फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्लामाबाद: पाकिस्तान आपल्या नौदलाला मजबूत करण्याच्या दिशेने झपाटच्याने पावले उचलत आहे. विशेष करुन पाकिस्तानने आण्विक पाणबुडीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पाकिस्तानचे माजी नौदल अधिकारी रिटायर्ड कमांडर ओबैदुल्लाह यांनी दावा केला आहे की, पाकिस्तान 2028 पर्यंत परमाणु पाणबुडी असलेल्या देशांमध्ये सामील होईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र, भारताची चिंता वाढली आहे. भारताही आपली नौैदल ताकद वाढवण्याच्या दृष्टीकोनातून विचार करत आहे. तसेच औबैदुल्लाह यांनी भारताच्या नौदल सामर्थ्याचे देखील कौतुक केले आहे.
जागतिक स्तरावर पाकिस्तानी नौदलाच्या आधुनिकीकरणाबद्दल मोठी उत्सुकता
मात्र, ओबैदुल्लाह यांनी स्पष्ट केलेल नाही की, ही आण्विक पाणबुडी बॅलेस्टिक मिसाईल क्षमतेची असेल की, न्यूक्लियर पॉव्रड अटॅक आण्विक पाणबुडी असेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानी नौदलाच्या आधुनिकीकरणाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ओबैदुल्लाह यांनी एका एका मुलाखती सांगितले की, पाकिस्तानच्या नौदलाकडे आधीपासूनच प्रतिउत्तरात्मक परमाणु हल्ला करण्याची क्षमता आहे. यामुळे पाकिस्तान काही निवडक देशांच्या गटामध्ये सामील झाला असून, त्यांच्याकडे ही धोरणात्मक ताकद आहे.
परमाणु आण्विक पाणबुडीचे महत्त्व
सध्या भारतासह जगातील फक्त सात देशांकडे आण्विक पाणबुडीची क्षमता आहे. प्रतिउत्तरात्मक आण्विक हल्ल्याची क्षमता ही कोणत्याही देशाच्या संरक्षण धोरणाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. यामध्ये हे सुनिश्चित केले जाते की, जर एखाद्या देशाची प्राथमिक परमाणु क्षमता नष्ट झाली, तरीही तो प्रतिहल्ला करू शकतो. या धोरणामध्ये आण्विक पाणबुडीद्वारे हल्ला करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
चीनच्या मदतीने आधुनिक पाणडुब्बी
औबैदुल्लाह यांनी सांगितले की, पाकिस्तानने चीनसह 8 प्रगत पाणबुडीच्या निर्मितीचा करार केला आहे. सध्या चार आण्विक पाणबुडी पाकिस्तानमध्ये तयार होत असनू उर्वरित चीनकडे आहेत. पाणडुब्बी अत्याधुनिक तत्रंज्ञानाने सुसज्ज केल्या जत असल्याचे औबैदुल्लाह यांनी सागंतिले.
भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची कबुली
मुलाखतीदरम्यान ओबैदुल्लाह यांनी भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे कौतुकही केले. त्यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानच्या नौदलाचा अनुपात 1947 साली 1:4 होता, जो आता 1:5 झाला आहे. त्यांनी मान्य केले की पाकिस्तान भारताप्रमाणे आपल्या नौदलावर मोठा खर्च करू शकत नाही. पाकिस्तानची आण्विक पाणबुडी विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा आणि चीनच्या सहकार्याने होत असलेले आधुनिकीकरण हे भारतासाठी धोरणात्मक दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकते. यामुळे भारताला आपली नौदल ताकद अधिक मजबूत करणे गरजेचे ठरणार आहे.