pakistan's Islamic solitary bids fail in Malyasia
भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानने सुरु केलेल्या लष्करी संघर्षात भारताने त्यांना धुळ चाटायला लावली. अगदी जागतिक स्तरावर देखील पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला. मात्र तरीही पाकिस्तान सुधारलेला नाही. भारताविरोधी पाकिस्तानाच्या कुरापती सुरुच आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आणखी एका देशाला भारताविरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने मलेशियातील भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न केला. परंतु क्वालालंपूर सरकारने पाकिस्तानला मोठा झट का दिला आहे. पाकिस्तानने इस्लामिक एकतेचे कारण देते मलेशियन अधिकाऱ्यांकडे भारतीय शिष्टमंडळाचे कार्यक्रम थांबवण्याची मागणी केली होती. पण मलेशियाने पाकिस्तानच्या या मागणीला पूर्णपणे नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दूतावासाने मलेशियन अधिकाऱ्यांना भारतीय प्रतिनिधी मंडळाचे क्रार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली. पण या उलट मलेशियाचा भारताच्या प्रतिनिधी मंडळाला पूर्ण पाठिंबा मिळाला. भारताच्या शिष्टमंडळाचे सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडले. पाकिस्तानसाठी हा एक मोठा राजनैतिक धक्का मानला जात आहे.
पाकिस्तानने तालिबान-अफगाणिस्तानला देखील भारतविरोधी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तुर्की, अझबैजान, चीन आणि ताजिकिस्तानने देखील पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु जगातील अनेक देशांनी पाकिस्तानला धूडकावून लावले आहे.
JDU चे खासदार संजय झा यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाचा हा दौरा पार पडला आहे. या शिष्टमंडळात भाजपच्या अपराजिता सारंगी, ब्रिजलाल, प्रधान बरुआ हेमांग जोशी, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी सीपीएमचे जॉन ब्रिटास आणि कॉंग्रेसचे सलमान खुर्शीद आणि माजी मुत्सद्दी मोहीन कुमार यांचा समावेश होता.
भारताच्या शिष्टमंडळाचा दौरा जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये पार पडला. भारताच्या या दौऱ्याचा उद्देश दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्ताच्या भूमिकेचा पर्दाफाश करणे आणि पहलगाम हल्ल्यामनंतर भारताने केलेल्या कारवाईची ऑपरेशन सिंदूरची माहिती जगासमोर मांडणे होता.
संजय झा यांनी आयएएनसला शिष्टमंडळाचा दौरा यशस्वी झाल्याचे सांगितले. जगभरातील देशांनी २२ एप्रिल रोजी घडलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि २६ निरापराध मत लोकांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय भारताने FATA कडून पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.
“शिष्टमंडळाचा उद्देश इतर देशांना भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईबद्दल ग्रहणशील बनवणे होता.” हा उद्देश सफल झाला आहे. प्रत्येक देश दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत उभा आहे, आणि दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. शिष्टमंडळाने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की, भारत हा दहशतवादाविरोधी एकजूट राहिल.