दहशतवादाला पाकिस्तानात थारा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पाकिस्तान आणि दहशतवादामधील संबंध हे जगाला काही नवीन नाहीत. हा देश दहशतवाद्यांना पोसतो आणि हे नेहमी सिद्ध होत आले आहे. अलिकडेच, पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक मोहम्मद खान हे लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरीच्या समर्थनार्थ बोलताना दिसून आले आहेत. अमेरिकेने दहशतवादी घोषित केलेल्या लष्कर प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदसोबत त्यांनी एका रॅलीतही भाग घेतला असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
पाकिस्तान नेहमीच भारताच्या पाठीत खंजीर खुपसत असतो आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालत असतो आणि आता हे पुन्हा एकदा यावरून सिद्ध झाले आहे. दहशतवाद्यांच्या अत्यंसंस्कारांमध्येही पाकिस्तानचे वरीष्ठ दिसून आले होते आणि इतर वेळी मात्र आपण कोणत्याही दहशतवाद्यांना थारा देत नसल्याचे दर्शविण्यात येते (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
दहशतवाद्यांना घातले पाठिशी
TOI च्या वृत्तानुसार, मलिक अहमद खान यांनी स्पष्टपणे सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असलेल्या कसुरीला कोणत्याही चौकशीशिवाय आरोपी म्हणून पाहिले जाऊ नये. इतकेच नाही तर त्यांनी कसुरींशी वैयक्तिक संबंधांचाही उल्लेख केला. परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रातील कसुरी आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांबद्दल चर्चा सुरू असताना तल्हा यांची कसुरींसोबत उपस्थिती उघडकीस आली. १९७१ च्या युद्धात भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या फाळणीचा बदला घेण्यात त्यांना मिळालेल्या यशाचा त्यांना खूप अभिमान होता.
रॅलीमध्ये दहशतवादी
रॅलीच्या व्हिडिओ फुटेजमध्ये लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी अमेरिकन M4 कार्बाइन घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांसह येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्यावर फुले उधळली जात आहेत आणि त्याला पहलगाम हल्ल्यातील भारताचा विजेता म्हटले जात आहे. यादरम्यान, दहशतवाद्याने मेळाव्याला संबोधित करताना बांगलादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे गर्वाने सांगितले, ज्यामुळे त्याला भारतात आश्रय घ्यावा लागला असाही उल्लेख कऱण्यात आलाय.
दहशतवाद्याच्या मृत्यूवर शोक केला व्यक्त
रहीम यार खान येथे आपल्या समर्थकांना संबोधित करताना कसुरी म्हणाला, “१९७१ मध्ये पाकिस्तानचे तुकडे झाले तेव्हा मी चार वर्षांचा होतो. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषणा केली होती की त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत खलीज (बंगालच्या उपसागरात) बुडवला आहे. १० मे रोजी आपण १९७१ चा बदला घेतला.” त्यांनी भारतीय हवाई दलाने मुरीदकेवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा उल्लेख केला ज्यामध्ये दहशतवादी मुदस्सर मारला गेला आणि त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यापासून रोखल्याबद्दल दुःख व्यक्त केले. कसुरीने यावेळी म्हटले की, “मला त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्याच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी मी खूप रडलो.”