Passenger Train Hijacked In Pakistan by Rebel Group bla Claims 100 Hostages
इस्लामाबाद: एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याची माहिती समोर आली. ट्रेनमधील सर्व प्रवाशांना ओलिस ठेवण्यात आले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावरुन या अपहरणाची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील बलुचिस्तान क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वा येथून पेशावरला जात असताना ही घटना घडली. BLA ने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, ही कारवाई मश्काफ, धादर, बोलान या भागंत करण्यात आली. सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला होता. यामुळे जाफर एक्सप्रेस थांबवावी लागली याच दरम्यान BLA ने ट्रेनचे अपहरण केले.
लष्करी कारवाई केल्यास लोकांना मारले जाईल- BLA
बलुच लिबरेशन आर्मीने आपल्या निवदेनात सांगितले की, सर्व प्रवाशांना आम्ही ओलिस ठेवले आहे. त्यांनी धमकी दिली आहे की, जर पाकिस्तानी लष्कराने किंवा सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम होती. बंदी बनवलेल्या सर्व ओलिसांना मारण्यात येईल आणि या हत्यांची संपूर्ण जबाबादारी पाकिस्तान लष्कराची असेल.
बलुच लिबरेशन आर्मी (BLA)
सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या
BLA ने सांगितले की, हे मिशन माजिद ब्रिगेड, STOC आणि फतेह स्क्वॉड एकत्रितपणे करत आहोत. कोणत्याही लष्करी घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा लष्करी कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच शेकडो प्रवासी BLA च्या कैदेत आहेत. या कारवाईची संपूर्म जबाबादारी BLA ने स्वीकारली आहे.
गोळीबारही करण्यात आला
मीडिया रिपोर्टनुसार, जाफर एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात ट्रेन चालक जखमी झाला आहे. तसेच काही प्रवासी देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनला एकूण 9 डब्बे असून यामध्ये सुमारे 500 प्रवासी आहेत, जे सध्या BLA च्या कैदेत आहेत. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप या अपहरणाचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.