Peru's Gen Z rallies against government pensions law and corruption
Gen Z Protest in Peru : लिमा : नेपाळनंतर (Nepal Protest) आता दक्षिण अमेरिका देश पेरुमध्ये Gen Z च्या तरुणांनी आंदोलन छेडले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेरुत प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. पेरुची राजधानी लिमामध्ये अनेक तरुण रस्त्यावर उतरुन सरकारविरोधी घोषणाबाजी कत आहे. सरकारच्या अनिवार्य पेन्शन कायद्यामुळे हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
या कायद्यानुसार, १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला प्रेन्शन प्रोव्हाइडर कंपनीशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु पेरुतील तरुणांच्या मते, हा कायदा त्यांच्यावर अन्याय करणारा आणि नागरिकांपेक्षा मोठ्या उद्योजकांना फायदा पोहोचवणार आहे.
या कारणांमुळे देखील सुरु आहेत देशात तीव्र आंदोलने
मिळालेल्या माहितीनुसार, पेरुतील आंदोलने केवळ पेन्शन कायद्यामुळेच नाही, तर सरकारच्या भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी आणि राजकीय अस्थिरतेमुळे युवा पिढी संतप्त झाली आहे. तसेच पेरुचे राष्ट्राध्यक्ष दीना बोलुआर्टे यांनी २०२२ मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष पेद्रो कॅस्टिलो यांना अकट करण्यात आली आहे. यानंतर पेरुतील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष वाढला आहे.
पोलिस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये चकामक
या आंदोलनांदरम्यान पोलिस आणि तरुणांमध्ये चकामक झाली आहे. यामध्ये अनेक पोलिस, निदर्शनकर्ते, आणि पत्रकार जखमी झाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम
शिवाय पेरु हा तांबे, सोने आणि चांदीचा महत्त्वाचा उत्पादक देश आहे. पण सततच्या आंदोलनांमुळे देशातील खाण उद्योगावर मोठा परिणाम होत आहे.यामुळे हुडबे मिनरल्ससारख्या कंरन्यांना मिल बंद करावी लागली आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे.
सध्या या आंदोलनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे. याच वेळी या आंदोलनांमागे अमेरिकेचा हात असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलनात २७% १८ के २९ वयोगटांतील तरुणांचा सामवेश आहे.
FAQs( संबंधित प्रश्न)
पेरुमध्ये तरुण रस्त्यावर का उतरले?
पेरुमध्ये सरकारच्या अनिवार्य पेन्शन कायद्यामुळे आणि भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी आणि राजकीय अस्थिरता या कारणांमुळे देशातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत.
पेरुमधील तरुणांच्या आंदोलनामुळे काय परिस्थिती आहे?
पेरुतील तरुणांच्या आंदोलनांमुळे देशातील खाण उद्योगावर परिणाम होत असल्याने अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
या आंदोलात कोणत्या देशाचा हस्तक्षेप असल्याच्या चर्चा सुरु आहेत?
या आंदोलनामांगे अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याचे तज्ज्ञांनी वर्तवले आहे.
UNGA मध्ये भारताचा डंका! PM मोदींच्या जागतिक नेतृत्त्वाचे आंतरराष्ट्रीय देशांकडून कौतुक