Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peter Navarro on India: ‘भारत अमेरिकन डॉलर वापरून रशियन तेल खरेदी करतो’; पीटर नवारोचे पुन्हा भडक वक्तव्य

Peter Navarro on India : नवारोने दावा केला की भारतीय रिफायनर्स स्वस्त रशियन तेल खरेदी करतात आणि त्यावर प्रक्रिया करतात. नंतर ते इंधन युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये निर्यात करतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2025 | 02:31 PM
Peter Navarro on India: 'India buys Russian oil using US dollars'; Peter Navarro's bold statement again

Peter Navarro on India: 'India buys Russian oil using US dollars'; Peter Navarro's bold statement again

Follow Us
Close
Follow Us:

Peter Navarro on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर जोरदार टीका केली आहे. रशिया-युक्रेन युद्धाला “मोदींचे युद्ध” असे संबोधल्यानंतर आता त्यांनी असा आरोप केला आहे की, भारत सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकन डॉलरचा वापर करतो आणि या मार्गाने व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धखर्चाला अप्रत्यक्ष आधार देतो. नवारो यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भगव्या रंगाच्या पोशाखातील फोटो शेअर करत त्यावर वर्णद्वेषी टिप्पणीही केली. त्यांनी लिहिले “युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग नवी दिल्लीतून जातो.” या विधानामुळे अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे वादंग उसळले आहे.

भारतावर “तेल मनी लाँडरिंग”चा आरोप

नवारो यांनी आरोप केला की, भारतीय रिफायनरी कंपन्या मोठ्या प्रमाणावर स्वस्त रशियन कच्चे तेल विकत घेतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि नंतर युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये ते इंधन म्हणून निर्यात करतात. त्यांचा दावा आहे की, ही व्यवहार पद्धती केवळ भारताच्या फायद्यासाठी नाही तर रशियाच्या युद्धयंत्रणेलाही अप्रत्यक्ष श्वास देणारी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार  “भारताची तेल लॉबी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला क्रेमलिनसाठी एक प्रचंड शुद्धीकरण केंद्र आणि तेल मनी लाँडरिंग हबमध्ये रूपांतरित करत आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi In Japan : भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक; AI, सेमीकंडक्टर आणि बुलेट ट्रेन चर्चेत

आकडेवारी काय सांगते?

रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी, भारताकडून रशियन तेल खरेदी एक टक्का देखील नव्हती. पण 2022 नंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. आज भारत आपल्या तेल आयातीपैकी ३० टक्क्यांहून अधिक रशियाकडून आयात करतो. दररोज जवळपास १.५ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल भारतात येते. इतिहासात भारत जास्तीत जास्त मध्यपूर्वेवर अवलंबून होता, पण युक्रेन युद्धानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियन तेलावर निर्बंध घातले. सात देशांच्या गटाने (G7) प्रति बॅरल ६० डॉलरची मर्यादा लावली. यामुळे रशियाला नवे खरेदीदार शोधावे लागले आणि भारताने सवलतीच्या दराचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर रशियन तेल आयात सुरू केली.

अमेरिकन बाजार आणि भारत

नवारो यांनी आणखी एक दावा केला की, अमेरिकन ग्राहक भारतीय वस्तू खरेदी करतात, पण भारत अमेरिकन उत्पादनांना उच्च शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळ्यांद्वारे अडवतो. त्यांच्या मते, भारत याच डॉलर्सचा वापर करून सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी करतो.

त्यांच्या म्हणण्यानुसार – “हे केवळ अनुचित व्यापार नाही, तर थेट रशियन युद्धखर्चाला चालना देणारे आहे.”

भारताचा दृष्टिकोन वेगळा

तथापि, भारताने नेहमीच स्पष्ट केले आहे की त्याची धोरणे “राष्ट्रीय हित” लक्षात घेऊन आखली जातात. भारतीय परराष्ट्र धोरणकर्त्यांच्या मते, स्वस्त दरात ऊर्जा खरेदी करणे हे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, तर खुले बाजारात उपलब्ध असलेल्या ऊर्जेचा योग्य वापर केला आहे. भारताचा नेहमीचा युक्तिवाद असा आहे की  ऊर्जा सुरक्षा ही देशाच्या आर्थिक स्थैर्याशी थेट जोडलेली आहे. म्हणूनच कुठल्याही दबावाला बळी न पडता, देश आपल्या नागरिकांच्या हितासाठी सवलतीच्या दरात तेल खरेदी करणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MAGA Heir : जेडी व्हान्स लवकरच होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष? ट्रम्पच्या प्रकृतीवरून चर्चांना उधाण; उपाध्यक्षांचे मोठे विधान

नवारोचे विधान : राजकारण की वास्तव?

पीटर नवारो यांच्या या विधानामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप तज्ज्ञ करतात. ट्रम्प यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांची वक्तव्ये निवडणूक राजकारणाशी जोडूनही पाहिली जात आहेत. मात्र एवढे नक्की की भारताची रशियाकडून वाढती आयात जागतिक बाजारावर परिणाम करत आहे. रशियाला ग्राहक मिळाल्याने त्याच्या तेल उद्योगाला स्थिरता मिळत आहे, तर भारताला सवलतीच्या दरात ऊर्जा उपलब्ध होत आहे. नवारोचे आरोप कितपत बरोबर आहेत यावर अजूनही चर्चा सुरूच आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे – भारत आज जागतिक ऊर्जा समीकरणातील एक महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे बदललेल्या या चित्रात, भारताने स्वतःसाठी “सवलतीच्या ऊर्जेचे धोरणात्मक शस्त्र” तयार केले आहे.

Web Title: Peter navarro claims india uses usd for russian oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • india
  • international news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

MAGA Heir : जेडी व्हान्स लवकरच होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष? ट्रम्पच्या प्रकृतीवरून चर्चांना उधाण; उपाध्यक्षांचे मोठे विधान
1

MAGA Heir : जेडी व्हान्स लवकरच होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष? ट्रम्पच्या प्रकृतीवरून चर्चांना उधाण; उपाध्यक्षांचे मोठे विधान

US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले
2

US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले

PM Modi In Japan : भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक; AI, सेमीकंडक्टर आणि बुलेट ट्रेन चर्चेत
3

PM Modi In Japan : भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक; AI, सेमीकंडक्टर आणि बुलेट ट्रेन चर्चेत

Who is Next PM: कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? ‘या’ नावांना मिळाली सर्वाधिक पसंती; व्हाल थक्क
4

Who is Next PM: कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? ‘या’ नावांना मिळाली सर्वाधिक पसंती; व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.