दक्षिण चीन समुद्रात घडली धक्कादायक घटना; चिनी तटरक्षक दलाच्या दोन जहाजांत टक्कर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
China–Philippines maritime clash : दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाचे केंद्रबिंदू ठरलेल्या दक्षिण चीन समुद्रात सोमवारी (दि. ११ ऑगस्ट २०२५) एक धक्कादायक घटना घडली. फिलीपिन्सच्या गस्ती बोटीचा पाठलाग करताना चिनी नौदलाचे युद्धनौक व चिनी तटरक्षक दलाचे जहाज एकमेकांवर आदळले. या भीषण टक्करचे व्हिडिओ फुटेज फिलीपिन्स तटरक्षक दलाने जाहीर केले असून, तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
फिलीपिन्स तटरक्षक दलाने सोमवारी संध्याकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (माजी ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात स्पष्टपणे दिसते की, फिलीपिन्सच्या गस्ती नौकेचा पाठलाग करताना चिनी नौदलाची युद्धनौक व क्रमांक CCG 164 असलेले चिनी तटरक्षक जहाज, समुद्रात अतिशय धोकादायक पद्धतीने वळण घेत एकमेकांवर जोरात आदळतात. ही घटना दक्षिण चीन समुद्रातील स्कारबोरो शोल (Scarborough Shoal) परिसरात घडली. हा परिसर बराच काळापासून चीन व फिलीपिन्स यांच्यातील वादाचा केंद्रबिंदू आहे. घटनेच्या वेळी फिलीपिन्स तटरक्षक दल आपल्या मच्छिमारांना मदत करणाऱ्या जहाजांना एस्कॉर्ट करत होते.
हे देखील वाचा : ऊर्जाक्षेत्रात रशियाची LNG झेप; जागतिक ऊर्जा खेळातील नवा मोहरा, अमेरिका–युरोपलाही नितांत गरज
फिलीपिन्स तटरक्षक दलाचे प्रवक्ते कमोडोर जे तारिएला यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, CCG 3104 क्रमांकाचे चिनी तटरक्षक जहाज, फिलीपिन्सच्या गस्ती बोटीच्या स्टारबोर्ड क्वार्टर (उजव्या मागील भाग) कडून धोकादायक वळण घेत होते. त्या क्षणी ते पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) नेव्हीच्या युद्धनौकेला धडकले, जी BRP सुलुआन नावाच्या फिलीपिन्स गस्ती बोटीचा पाठलाग करत होती.
तारिएला म्हणाले,
“या धडकेमुळे CCG जहाजाच्या समोरील भागाला गंभीर नुकसान झाले असून, ते आता समुद्रात जाण्यायोग्य राहिलेले नाही. चिनी जहाजाने घेतलेली वळणाची पद्धत पूर्णपणे बेपर्वा आणि धोकादायक होती.”
फिलीपिन्स तटरक्षक दलाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण घटना टिपली गेली आहे. समुद्रातील उंच लाटा, युद्धनौका आणि गस्ती जहाजांचा वेग, तसेच अचानक घडलेली टक्कर या सगळ्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत नाट्यमय वाटतो. सोशल मीडियावर काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाल्याने ही घटना जागतिक माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे.
While attempting to chase and corner a patrol boat with the Philippine Coast Guard near Bajo de Masinloc in the West Philippine Sea on Monday, a ship with the China Coast Guard (CCG-3104) collided with a Type 052D Destroyer of the Chinese People’s Liberation Army Navy (DDG-164).… pic.twitter.com/D1Ph8zkO7W
— OSINTdefender (@sentdefender) August 11, 2025
credit : social media
चिनी तटरक्षक दलाचे प्रवक्ते गान यू यांनीही या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले. मात्र, त्यांनी टक्कर झाल्याचा स्पष्ट उल्लेख टाळला. गान यू म्हणाले,
“चीनी तटरक्षक दलाने कायद्यानुसार आवश्यक असलेली सर्व पावले उचलली आहेत. यामध्ये पाळत ठेवणे, बाह्य दबाव, फिलीपिन्स जहाजांना हटवणे आणि नियंत्रण यांचा समावेश आहे.”
चीनने टक्कर ही त्यांच्या चुकांमुळे झाली की अपघाताने, याबाबत कोणतेही स्पष्ट विधान केलेले नाही.
दक्षिण चीन समुद्र हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असून, इथे तेल, वायू आणि मत्स्यसंपत्तीचे प्रचंड साठे आहेत. चीन जवळपास संपूर्ण समुद्रावर हक्क सांगतो, तर फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांचा यावर तीव्र आक्षेप आहे. स्कारबोरो शोल हे त्यातील सर्वाधिक वादग्रस्त क्षेत्रांपैकी एक आहे. फिलीपिन्सच्या मच्छिमारांना येथे मासेमारी करण्याचा पारंपरिक हक्क असला तरी, चीन वारंवार आपली युद्धनौका आणि तटरक्षक जहाजे पाठवून त्यांना रोखत असतो.
Here is a longer video capturing the collision between the PLA Navy 164 and the China Coast Guard 3104. The Philippine Coast Guard (PCG) has consistently urged the Chinese government to respect the COLREGS and to approach these matters with professionalism, especially considering… https://t.co/n7vcU4lGWq pic.twitter.com/cHU7rG2wAj
— Jay Tarriela (@jaytaryela) August 11, 2025
credit : social media
या टक्करमुळे चीन-फिलीपिन्स तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देश फिलीपिन्सच्या पाठीशी उभे आहेत. अलीकडच्या काळात अमेरिकन नौदलानेही दक्षिण चीन समुद्रात ‘स्वातंत्र्य नौकानयन’ मोहिमा (Freedom of Navigation Operations) राबवल्या आहेत. त्यामुळे या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणखी वाढू शकतो.
हे देखील वाचा : Cyber Fraud India 2025 : काय आहे तो ‘कॉल सेंटर घोटाळा’ ज्यामुळे अमेरिकेतील लोक करत आहेत भारतीयांचा द्वेष?
या घटनेचा व्हिडिओ जाहीर करून फिलीपिन्सने स्पष्ट संदेश दिला आहे की, ते चीनच्या दबावाखाली झुकणार नाहीत. फिलीपिन्सच्या समुद्री हद्दीत किंवा त्यांच्या पारंपरिक मासेमारी क्षेत्रात हस्तक्षेप झाल्यास ते सार्वजनिकरित्या उघड करतील.
तज्ज्ञांच्या मते,
“फिलीपिन्सने या घटनेचे फुटेज प्रसिद्ध करून चीनच्या आक्रमक धोरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड केले आहे. यामुळे चीनवर राजनैतिक दबाव वाढेल.”
दक्षिण चीन समुद्रात घडणाऱ्या अशा घटना केवळ सागरी अपघात नसून, त्या प्रादेशिक व जागतिक सामरिक तणावाचे प्रतिक आहेत. समुद्रातील टक्कर ही फक्त जहाजांची नव्हे, तर दोन राष्ट्रांच्या राजकीय इच्छाशक्तींची धडक आहे. या घटनेनंतर, पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही देशांकडून नवे आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. तसेच, अमेरिकेसह इतर देशांच्या हालचालींवरही जगाचे लक्ष लागून राहणार आहे.