Dubai International Airport वर इराणी ड्रोनचा धुमाकूळ; एका भारतीयासह ४ जण रक्ताच्या थारोळ्यात, या गोंधळाचा VIDEO VIRAL ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iranian Drone Crash at Dubai Airport : (US-Israel Iran War) संयुक्त अरब अमिरातीची आर्थिक राजधानी असलेल्या दुबईमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी सकाळी जगातील सर्वात व्यस्त समजल्या जाणाऱ्या ‘दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ (Dubai International Airport) दोन इराणी ड्रोन कोसळले. या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भीषण दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाला गंभीर दुखापत झाली असून इतर तीन परदेशी नागरिकही जखमी झाले आहेत.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास इराणकडून आलेले दोन ड्रोन दुबई विमानतळाच्या (DXB) हद्दीत शिरले. हे दोन्ही ड्रोन एकमेकांवर आदळले किंवा तांत्रिक बिघाडामुळे विमानतळाच्या अगदी जवळ कोसळले. दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत घानाचे दोन नागरिक आणि एक बांगलादेशी नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, एका भारतीय नागरिकाला ‘मध्यम’ स्वरूपाची दुखापत झाली असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Threat: जगावर अणुयुद्धाचं सावट! जमिनीखाली शेकडो फूट खोल सुरक्षित आहेत Iranचे अणू बॉम्ब; IAEA चा सावधानतेचा इशारा
ड्रोन कोसळल्याचा आवाज होताच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी तातडीने धाव घेतली. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आकाशात धुराचे लोट आणि लोकांची पळापळ दिसत आहे. दुबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हे ड्रोन हेतुपुरस्सर हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आले होते की तांत्रिक चुकीमुळे भरकटले होते, याचा शोध घेतला जात आहे. इराण आणि मध्यपूर्वेतील सध्याचा तणाव पाहता या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.
विमानतळाच्या इतक्या जवळ ड्रोन पडल्यानंतरही दुबईच्या नागरी विमानचालन प्राधिकरणाने (GCAA) कमालीची तत्परता दाखवली. विमानतळावरील सुरक्षा तपासणी कडक करण्यात आली असली तरी, विमानांची ये-जा थांबवण्यात आलेली नाही. सर्व उड्डाणे त्यांच्या नियोजित वेळेनुसार सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळाच्या परिमितीवर अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.
Authorities confirm that two drones fell in the vicinity of Dubai International Airport (DXB) a short while ago, resulting in minor injuries to two Ghanaian nationals and one Bangladeshi national, and moderate injuries to one Indian national. Air traffic is operating as normal. — Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 11, 2026
credit – social media and Twitter
दुबई हे भारतीयांसाठी व्यवसायाचे आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. दररोज हजारो भारतीय नागरिक या विमानतळाचा वापर करतात. अशा परिस्थितीत थेट विमानतळावरच ड्रोन कोसळल्याने तेथील भारतीय समुदायात चिंतेचे वातावरण आहे. भारतीय दूतावास जखमी भारतीयाच्या संपर्कात असून त्याला सर्वतोपरी मदत केली जात आहे.
Two drones fell near Dubai International Airport, injuring 4. UAE authorities are imposing heavy penalties for sharing attack footage. pic.twitter.com/4El5HKzK7q — World Vibe (@world_vibe_en) March 11, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : THAAD Defence: युद्धात इराणला पहिलं यश! इराणच्या धाकाने दक्षिण कोरियाचं ‘कवच’ हिसकावलं; किम जोंग-उनला मोठी संधी
मध्यपूर्वेतील युद्ध आता थेट सार्वजनिक ठिकाणांपर्यंत पोहोचले आहे का? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. दुबई सरकारने अद्याप याला ‘थेट हल्ला’ म्हटलेले नाही, परंतु तपासाअंती अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी दुबई मीडिया ऑफिसच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे.
Ans: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ इराणचे दोन ड्रोन कोसळल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.
Ans: या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाला मध्यम स्वरूपाची दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Ans: होय, दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणे आणि कामकाज सामान्यपणे सुरू आहे, प्रवाशांना काळजी करण्याचे कारण नाही.






