Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा

Chola Copper Plates Return India : नेदरलँड्सच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्समधील लीडेन विद्यापीठात शतकानुशतके ठेवलेले ११ व्या शतकातील चोळ ताम्रपट भारताला परत करण्याची घोषणा केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 17, 2026 | 08:26 AM
pm modi netherlands visit may 2026 chola dynasty copper plates repatriation india

pm modi netherlands visit may 2026 chola dynasty copper plates repatriation india

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक सांस्कृतिक विजय
  • मोदी-रॉब झेटन सोहळा
  • राजेंद्र चोळ यांचा वारसा

PM Modi Netherlands Visit May 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या पाच देशांच्या परदेश दौऱ्यातून भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून नेदरलँड्सच्या लीडेन विद्यापीठात (Leiden University) कैद असलेला ११व्या शतकातील चोळ साम्राज्याचा सर्वात मौल्यवान सांस्कृतिक ठेवा अखेर भारताला परत मिळाला आहे. हेग येथे डच पंतप्रधान रॉब झेटन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका भव्य आणि अधिकृत सोहळ्यात हे ऐतिहासिक ‘चोळ ताम्रपट’ (Aniamangalam Copper Plates) भारत सरकारच्या स्वाधीन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर ही माहिती शेअर करताना, “हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे या ताम्रपटांचा इतिहास आणि महत्त्व?

हे ताम्रपट केवळ जुन्या वस्तू नसून, भारताच्या सुवर्ण इतिहासाचे आणि जागतिक सागरी महासत्तेचे जिवंत पुरावे आहेत. एकूण २४ ताम्रपटांचा हा संच आहे, ज्यामध्ये २१ मोठे आणि ३ लहान ताम्रपट एका विशाल काशाच्या (Bronze) कड्याने जोडलेले आहेत. या कड्यावर थेट महान चोळ सम्राट राजेंद्र चोळ प्रथम यांची अधिकृत राजमुद्रा (Royal Seal) कोरलेली आहे. या ताम्रपटांवर अतिशय सुंदर अक्षरात तमिळ आणि संस्कृत भाषेत कोरीव काम करण्यात आले असून, त्याचे एकूण वजन सुमारे ३० किलोग्रॅम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद

राजाराजा प्रथम आणि राजेंद्र चोळ यांचे तोंडी वचन!

इतिहासकारांच्या मते, हे ताम्रपट ११व्या शतकातील (१०१२-१०४४ ईस्वी) आहेत. महान चोळ सम्राट राजाराजा प्रथम (Rajaraja I) यांनी तामिळनाडूच्या नागपट्टिनम येथे बौद्ध विहाराला (Chulamanivarma-vihara) ‘अनाईमंगलम’ गाव दान देण्याचे एक तोंडी वचन दिले होते. वडिलांचे हेच वचन पूर्ण करण्यासाठी त्यांचे पराक्रमी पुत्र सम्राट राजेंद्र चोळ प्रथम (Rajendra Chola I) यांनी हे तोंडी आश्वासन तांब्याच्या पत्रांवर कोरून त्याचे कायद्यात रूपांतर केले. हे ताम्रपट चोळ साम्राज्याची प्रशासकीय व्यवस्था, कर रचना, जलव्यवस्थापन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू राजे असूनही बौद्ध धर्माला दिलेले राजाश्रय म्हणजेच धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण दर्शवतात.

A joyous moment for every Indian! Chola Copper Plates dating back to the 11th Century will be repatriated to India from the Netherlands. Took part in the ceremony for the same in the presence of Prime Minister Rob Jetten. The Chola Copper Plates are a set of 21 large plates… pic.twitter.com/Zwu0QFc2ZJ — Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026

credit – social media and Twitter

३०० वर्षांपूर्वी डच कंपनीने भारतातून कसे चोरले?

अन्वेषणातून असे समोर आले आहे की, १६८७ ते १७०० या काळात जेव्हा तामिळनाडूचा नागपट्टिनम भाग डच ईस्ट इंडिया कंपनीच्या (VOC) ताब्यात होता, तेव्हा डच अधिकाऱ्यांनी हे ताम्रपट बेकायदेशीरपणे उत्खनन करून भारताबाहेर नेले होते. १८६२ पासून हा अनमोल ठेवा नेदरलँड्सच्या लीडेन विद्यापीठाच्या लायब्ररीत ठेवण्यात आला होता. भारताने २०१२ पासून म्हणजेच गेल्या १४ वर्षांपासून हा ऐतिहासिक वारसा परत मिळवण्यासाठी राजनैतिक पातळीवर तीव्र लढा दिला होता. अखेर, वसाहतीकालीन बेकायदेशीर वस्तू परत करण्याच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या शिफारशीनुसार नेदरलँड्स सरकारने हे ताम्रपट भारताला बिनशर्त परत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jaishankar Diplomacy : जयशंकर-अराघची भेट ठरली गेमचेंजर! भारतासाठी इराणने खोलला समुद्राचा रस्ता; युद्धखोर देशांना कडक चपराक

भारतीय पुरातत्व विभागाकडे (ASI) सुपूर्द होणार

नेदरलँड्सकडून मिळालेले हे ऐतिहासिक ताम्रपट आता नवी दिल्लीत ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण’ (ASI) कडे सोपवले जातील. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एएसआय हे ठरवेल की हा अमूल्य खजिना देशातील कोणत्या भव्य संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला जाईल. पंतप्रधान मोदींच्या या यशस्वी दौऱ्यामुळे भारत आणि नेदरलँड्समधील द्विपक्षीय संबंध तर मजबूत झालेच आहेत, पण भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक दबदबा किती वाढला आहे, हे देखील सिद्ध झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेदरलँड्सने भारताला कोणते ऐतिहासिक वस्तू परत केल्या आहेत?

    Ans: नेदरलँड्सने ११व्या शतकातील ऐतिहासिक 'चोळ ताम्रपट' (Leiden Plates) भारताला अधिकृतपणे परत केले आहेत, जे चोळ साम्राज्याच्या इतिहासाचे दस्तऐवज आहेत.

  • Que: हे चोळ ताम्रपट किती जुने आहेत आणि त्यांचे वजन किती आहे?

    Ans: हे ताम्रपट सुमारे १००० वर्षे जुने (११व्या शतकातील) असून त्यांचे एकूण वजन जवळपास ३० किलो आहे. यात २४ ताम्रपटांचा समावेश आहे.

  • Que: हे ताम्रपट भारतात कोठे ठेवले जाणार आहेत?

    Ans: हे ताम्रपट नवी दिल्लीतील भारतीय पुरातत्व विभागाकडे (ASI) सुपूर्द केले जातील आणि त्यानंतर ते प्रदर्शनासाठी ठेवले जातील.

Web Title: Pm modi netherlands visit may 2026 chola dynasty copper plates repatriation india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • India news
  • Netherlands
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन
1

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद
2

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद

Jaishankar Diplomacy : जयशंकर-अराघची भेट ठरली गेमचेंजर! भारतासाठी इराणने खोलला समुद्राचा रस्ता; युद्धखोर देशांना कडक चपराक
3

Jaishankar Diplomacy : जयशंकर-अराघची भेट ठरली गेमचेंजर! भारतासाठी इराणने खोलला समुद्राचा रस्ता; युद्धखोर देशांना कडक चपराक

PM Modi: भारताकडे नेहमीच राहणार 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा; मोदींचा UAE सोबत ‘असा’ महाकारार, भारताला मिळालं कवच
4

PM Modi: भारताकडे नेहमीच राहणार 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा; मोदींचा UAE सोबत ‘असा’ महाकारार, भारताला मिळालं कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.