Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Political Crisis: नेपाळची सत्ता लष्कराच्या हाती जाणार? आर्मी चीफच्या सांगण्यावरुन पंतप्रधानांनी पद सोडल्याच्या रंगल्या चर्चा

Nepal Crisis : नेपाळमध्ये सध्या अराजकता पसरली आहे. पंतप्रधान ओली शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. मात्र आता देशावर राजकीय संकट ओढावले आहे. याच वेळी लष्कराच्या सांगण्यावरुन ओलींना राजीनामा दिला असल्याचे म्हटले जात आहे

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 09, 2025 | 03:39 PM
PM Oli resigned on the advice of the Army Chief.

PM Oli resigned on the advice of the Army Chief.

Follow Us
Follow Us:
  • आर्मी चीफच्या सांगण्यावरुन ओलींनी सोडले पद
  • नेपाळची सत्ता लष्कराच्या हाती जाणार?
  • परिस्थितीत अजूनही बिकट
Kathmandu Protest : सध्या नेपाळमध्ये मोठी अराजकता निर्माण झाली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी मंगळवारी (०९ सप्टेंबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी देखील त्यांचा राजीनामा स्वाकारला आहे. परंतु अजूनही नेपाळमधील राजकीय संकट वाढत आहे. सध्या लष्कराच्या हातात सत्ता जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यामागचे कारण म्हणजे नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी राजीनामा देताना लष्कराने पद सोडण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. तर परिस्थितीत हाताळता येईल असा सल्ला ओली यांनी देण्यात आला.

नेपाळमध्ये ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर बंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान यानंतर देशातील तरुणांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. यामध्ये २१ जणांचा मृत्यू, तर ३०० हून अधिक तरुण जखमी झाले होते. परस्थितीत अत्यंत बिघडत चालली होती. यावेळी पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याची आणि इतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान बिघडत असलेल्या परिस्थिती पाहता ओली शर्मा यांनी लष्कराकडे मदत मागितली होती.

KP Sharma Oli Resigns : नेपाळमध्ये सत्तापालट! अखेर पंतप्रधान केपी ओली यांचा राजीनामा,आंदोलकांनी पेटवली संसद

लष्कराच्या हाती जाणार सत्ता?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील परिस्थिती अत्यंत बिघडत चालली होती. यावेळी नेपाळचे आर्मी चीफ जनरल अशोक राज सिग्देल यांच्याकडे परिस्थितीतवर तोडगा काढण्यासाठी मदत मागितली. यावेळी आर्मी चीफ सीग्देल यांनी ओली यांना पद सोडण्याचा सल्ला दिला. त्यांनी पंतप्रधान ओलींना म्हटले, राजीनामा दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. शिवाय त्यांनी पंतप्रधान ओलींना निवास स्थानातून बाहेर पडण्यासाठीही मदत केली. यामुळे पंतप्रधानांनी राजीनामा दिला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. यामुळे सध्या नेपाळची सत्ता लष्कराच्या हाती जाणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.सध्या नेपाळमधील परिस्थिती देखील बिकट आहे. यामुळे नेपाळचे लष्कर सत्ता हाती घेउ शकते असे म्हटले जात आहे.

Nepal Prime Minister KP Sharma Oli resigns: officials (Source: Third Party)#NepalGenZProtest #KathmanduProtest pic.twitter.com/emqq1CMQVk — Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025

या मंत्र्यांनी दिला राजीनामा

दरम्यान या हिंसाचारात नेपाळच्या इतर काही मंत्र्‍यांनीही राजीनामा दिला आहे. नेपाळच्या कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपपंतप्रधान प्रकाश मान सिंह, आरजू राणा देऊबा (परराष्ट्र मंत्री), तेजू लाल चौधरी (क्रीडा मंत्री), अजय चौरसिया (कायदा मंत्री), दीपक खडका (ऊर्जा मंत्री), ऐन बहादूर शाही (वनमंत्री), प्रदीप पौडेल (आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री), रामनाथ अधिकारी (कृषी मंत्री) आणि बद्री पांडे (पर्यटन मंत्री) यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

FAQs( संबंधित प्रश्न)

नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन? 

नेपाळमध्ये सरकारच्या भष्ट्राचारांविरोधात, नेपोटिझ, देशातील बेरोजगारी आणि सोशल मीडियावरील बंदी या सर्व वादांमुळे आंदोलन सुरु होते.

नेपाळच्या पंतप्रधानांनी का दिला राजीनामा? 

नेपाळच्या पंतप्रधानांनी देशातील बिघडत चाललेली परिस्थिती पाहून लष्कराकडे मदत मागितली होती. यावेळी त्यांना पद सोडण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर परिस्थितीत नियंत्रणात येईल असे सांगण्यात आले. यामुळे ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असे म्हटले जात आहे.

Nepal Protest : कोण आहे सुदान गुरुंग? ज्याच्या एका आवाजाने ओली सरकारविरोधी तरुणांनी छेडले आंदोलन

Web Title: Pm oli resigned on the advice of the army chief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
2

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
3

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
4

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.