Politics heats up in Pakistan, Former Prime Minister Imran Khan's sons are under threat of arrest
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-तालिबान (PTI) पक्ष आणि सत्ताधारी पक्ष मुस्लिम लीग-नवाज (PML-N) मध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादाचे कारण पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची मुले सुलेमान आणि कासिम खान आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,पाकिस्तानमध्ये पुढच्या महिन्यात पाच ऑगस्टपासून इम्रान खान फ्री मूव्हमेंट सुरु करण्याची घोषणा इम्रान खानच्या मुलांनी केली आहे. यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान या घोषणेनंतर पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाने कोणत्याही प्रकारच्या हिसंक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इम्रान खानची बहिण अलिमा खान यांनी दावा केला आहे की, त्यांचा पुतण्या मोहिमेत भाग घेण्याची शक्यता आहे.
यामुळे पंजाबचे माहिती मंत्री अझमा बुखारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अझमा यांनी म्हटले आहे की, इम्रान खानची मुले सुलेमान आणि कासिम देशा अराजकता निर्माण करत आहे. त्यांनी असे करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अटक केली जाईल.
My children are not allowed to speak on the phone to their father @ImranKhanPTI. He has been in solitary confinement in prison for nearly 2 years.
Pakistan’s government has now said if they go there to try to see him, they too will be arrested and put behind bars.
This doesn’t… https://t.co/ccM7QFPmlV pic.twitter.com/z2v6PKgHto — Jemima Goldsmith (@Jemima_Khan) July 10, 2025
याच वेळी इम्रान खान यांच्या एक्स पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलांना त्यांच्या वडिलाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करुन दिला जात नाही, त्यांना फोनवर बोलूही दिले जात नाही. गेल्या एक वर्षापासून इम्रान खान यांना तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आले आहे. तसेच सरकार माझ्या मुलांनी त्यांच्या वडीलांशी संपर्क साधला तर त्यांनाही तुरुंगात टाकले जाईल अशी धमकी दिली आहे. यामुळे हा विषय वैयक्तिक सूडाचा बनत चालला असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
याच वेळी शहबाज सरकारचे खासदार इरफान सिद्दीकी यांनी सुलेमान आणि कासिम खानला त्यांच्या वडिलांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण निदर्शन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई होईल असेही म्हटले आहे.