इराणच्या हल्ल्याने अमेरिकेच्या एअरबेसचे प्रचंड नुकसान; सॅटेलाइट्स इमेजद्वारे मोठा खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दोहा/वॉशिंग्टन : इस्रायल आणि इराणमधील युद्धाबाबत सध्या अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. १२ दिवस चाललेल्या या युद्धाने मध्य पूर्वेत अस्थिरता निर्माण झाली होती. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत होते.दरम्यान या युद्धात अमेरिकेने देखील उडी घेतली होती. अमेरिकेने इराणच्या प्रमुख अणु तळांवर २२ जून रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इराणने तीव्र संताप व्यक्त केला होता. याच्या प्रत्युत्तरात इराणने २३ जून रोजी कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला. इराणने अमेरिकेच्या एअरबेसवर ६ क्षेपणास्त्रे डागली होती. परंतु या हल्ल्यात अमेरिकेचे कोणतेही नुकसान न झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती देताना म्हटले होते की, कतारमधील अमेरिकेन लष्करी तळावर इराणने हल्ला केला होता. इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. परंतु या क्षेपणास्त्रांमुळे लष्करी तळांचे किरकोळ नुकसान झाले. पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी सांगितले की, कतारमधील अमेरिकन एअरबेस अजूनही सुरक्षित आणि कार्यरत आहे. तसेच अमेरिका कतारच्या सहकार्याने प्रादेशिक सुरक्षा अभियान चालवत असल्याचे म्हटले होते.
परंतु आता या हल्ल्याच्या २० दिवसानंतर याचे सॅटेलाईट्स इमेज समोर आले आहेत. यामध्ये ट्रम्प यांच्या दाव्याच्या विरोधात दृश्य दिसत आहे. यामध्ये इराणच्या हल्ल्याने अमेरिकेन हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गॉर्ड कॉर्प्स (IRGC) ने देखील या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. इराणने या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे.
कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर प्रत्युत्तरात्मक कारवाईंअंतर्गत क्षेपणास्त्रे इराणने डागली होती. यामध्ये यामध्ये कतारच्या अल उदेद हवाई तळाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.सॅटेलाइट्स इमेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अमेरिकेच्या लष्करी तळाच्या मध्यभागी रेडोमला नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सॅटेलाइट्स इमेजमध्ये रेडोम क्षेत्रावर एक काळा डाग असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
🎯 Lucky Shot, or Bullseye? Before/after satellite photos appear to show that, in Iran’s counterstrike against the US Al Udeid airbase in Qatar, an American radome was nailed dead center by an Iranian missile. Looks like <5m CEP to me. pic.twitter.com/94XCxVnh8t — Will Schryver (@imetatronink) July 10, 2025
दरम्यान इराणी हल्ल्याच अमेरिकेच्या कतारमधील एअरबेसच्या रेडोम मॉडर्नायझेशन एंटरप्राइझ टर्मिनल (MET)चे नुकसान झाल्याचे दावा होत आहे. हे नुकसान अमेरिकेसाठी मोटा धक्का मानले जात आहे. या भागात अमेरिकेच्या १५ दशलक्ष डॉलर्सचती उपग्रह संप्रेषण प्रणाली आहे. या द्वारे संपूर्ण देशातील सैनिकांना व्हाइट, व्हिडिओ, आणि डेटा पाठवला जातो. यामुळे हे अत्याधुनिक अँटी-जॅमर तंत्रज्ञानाच्या नुकसानीने अमेरिकन लष्कराला मोठा धक्का बसला आहे. शिवाय हे तंत्रज्ञान केवळ कतारमध्ये आहे.